AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Funeral : मोठी बातमी, अजितदादांना अंत्यसंस्कारावेळी अखेरची सलामी देताना पोलिसाकडून मिसफायर VIDEO

Ajit Pawar Funeral : अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात निधन झालं. काल त्यांच्यावर बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी एका पोलीसाकडून मिसफायर झाल्याची घटना घडली आहे.

Ajit Pawar Funeral :  मोठी बातमी, अजितदादांना अंत्यसंस्कारावेळी अखेरची सलामी देताना पोलिसाकडून मिसफायर VIDEO
Police Misfire
| Updated on: Jan 30, 2026 | 1:34 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचं दोन दिवसांपूर्वी भीषण विमान अपघातात निधन झालं. बारामती एअरपोर्टजवळ अजितदादांच विमान लँडिंग करत असताना कोसळलं. यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेने महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजितदादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही कोणाला विश्वास बसत नाहीय. कारण असं काही होईल असा कोणी ध्यानीमनी सुद्धा विचार केला नव्हता. अजितदादांचं बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झालं. त्यांच्यावर काल बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विशाल जनसमुदायाने साश्रू नयनाने आपल्या लाडक्या नेत्याला निरोप दिला.

अजित पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांना अंत्यसंस्काराच्यावेळी शासकीय मानवंदना देण्यात आली. अजित पवार यांना सलामी म्हणून तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले. यावेळी एका पोलिस कर्मचाऱ्याकडून चुकून मिसफायर झालं. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

तिथे कोण-कोण होतं?

अजितदादांना पोलिसांकडून अखेरची सलामी देण्यात येत असताना ही घटना घडली. पोलिसांकडून सलामी देताना तीन राऊंड हवेत फायर केले जातात. यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना पोलिसाच्या बंदुकीतून मिसफायर झालं. सुदैवाने बंदुकीतून सुटलेली ही गोळी कोणाला लागली नाही. हे अत्यंत धोकादायक आहे. कारण अजित पवार यांच्या पार्थिवाला मुलांकडून मुखाग्नी दिली जात होता. यावेळी तिथे अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तिथे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, त्याशिवाय अन्य पक्षांचे नेते तिथे हजर होते. पण सुदैवाने कुठली अप्रिय घटना घडली नाही.

राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी
दादांवर भाजपचं खरं प्रेम असेल तर...; संजय राऊतांनी केली मोठी मागणी.
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली
पहिल्यांदाच असं घडलं... अजितदादांच्या जाण्याने मंत्रालयातील गजबज हरवली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.