
राज्यातील औरंगजेबाच्या कबरीचा वाद अजून थांबलेला नाही. औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावर हिंदुत्वादी संघटना ठाम असून ही कबर हटवण्याची वारंवार मागणी करत आहेत. त्यामुळे राज्यात तणावाची परिस्थिती आहे. खासकरून मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर पोलीसही अलर्ट झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात आता बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी औरंगजेबाची कबर दोन-तीन दिवसात उखडून टाकण्याचा इशारा दिला होता. ज्या ज्या संघटनांनी हा इशारा दिला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हा बंदीचे आदेश आहेत. तसेच इशारा देणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांच्या सात जणांना हे आदेश लागू करण्यात आले आहे.

तसेच औरंगजेबाच्या कबरीभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात येणाऱ्यांची कसून चौकशी केली जात आहे. तसेच प्रत्येकाची नोंद ठेवूनच त्यांना आत प्रवेश दिला जात आहे.

तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर बॅरेकेटिंग करण्यात आली आहे. तसेच एकावेळी एकाच व्यक्तीला आत प्रवेश करता येईल असे नियोजन पोलिसांनी केले आहे.