संजय राठोडांनी नगारा वाजवला, रामराव महाराजांचं दर्शन घेतलं

वन मंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवीला येऊन जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. (Pooja Chavan suicide case: Sanjay Rathod visits pohardevi temple with wife)

  • टीव्ही 9 मराठी, डिजीटल टीम
  • Published On - 14:39 PM, 23 Feb 2021
संजय राठोडांनी नगारा वाजवला, रामराव महाराजांचं दर्शन घेतलं
दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले होते. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले आणि दर्शन घेतलं.

वाशिम: वन मंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवीला येऊन जगदंबा मातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी रामराव महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. दर्शनानंतर समाधी भोवती प्रदक्षिणा घातली आणि नगाराही वाजवला. राठोड यांनी नगारा वाजवताच त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. (Pooja Chavan suicide case: Sanjay Rathod visits pohardevi temple with wife)

संजय राठोड आज दुपारी 12 वाजून 40 मिनिटाला पोहरादेवीत आले. पोहरादेवीत आल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम जगदंबा मातेच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी सेवालाल महाराजांचं दर्शन घेतलं. सेवालाल महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर रामराव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी ते निघाले. पण मध्येच जगदंबा मातेच्या मंदिरात जाऊन त्यांनी थोडावेळ महंतांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी रामराव महाराजांच्या समाधीस्थळी येऊन समाधीला प्रदक्षिणा घालत रामराव महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी नगाराही वाजवला. नगारा वाजवल्यानंतर राठोड यांनी हात उंचावून जमावाला अभिवादन केलं.

गर्दी आणि रेटारेटी

राठोड येणार म्हटल्यावर पोहरादेवी मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली होती. या परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. त्यामुळे अनेक लोक घरांवर आणि झाडांवर चढले होते. तर अनेक समर्थकांनी राठोड यांचा फोटो असलेले फलक हातात घेऊन ते उंचावले होते. राठोड यांनीही या समर्थकांना हात उंचावून अभिवादन केलं. त्यामुळे राठोड समर्थकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी केली. हजारो लोक पोहरादेवी गडावर आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. या गर्दीमुळे राठोड यांना वाट काढणंही मुश्किल झालं होतं. त्यामुळे पोलिसांना गर्दीवर लाठीमार करावा लागला.

पत्नीला भोवळ

संजय राठोड हे त्यांची पत्नी शितल राठोड यांच्यासह पोहरादेवी गडावर आले होते. यावेळी राठोड यांना वाट मिळावी म्हणून स्वत: शितल राठोड या गर्दीला पांगवत होत्या. मंदिरांना भेटी देता देता गर्दी पांगवत असतानाच शितल यांना भोवळ आली. त्यामुळे राठोड यांना काहीवेळ मंदिरात थांबावं लागलं होतं. (Pooja Chavan suicide case: Sanjay Rathod visits pohardevi temple with wife)

 

संबंधित बातम्या:

प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

संजय राठोड दोन तासात पोहरादेवीत; वाचा, सकाळपासून नेमकं काय काय घडलं!

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

(Pooja Chavan suicide case: Sanjay Rathod visits pohardevi temple with wife)