प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

पोहरादेवी गडावर दर्शनासाठी गेलेल वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या पत्नी शीतल यांना (Sheetal Rathod) भोवळ आली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:45 PM, 23 Feb 2021
प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!
Sheetal Rathod Sanjay Rathod

वाशिम : पोहरादेवी गडावर दर्शनासाठी गेलेल वनमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल  यांना (Sheetal Rathod) भोवळ आली. पोहरादेवी गडावर संजय राठोड समर्थकांची प्रचंड गर्दी आहे. या गर्दीतून वाट काढत पायथ्यापासून ते गाभाऱ्यापर्यंत राठोड पती पत्नी पोहोचले. समर्थकांची प्रचंड गर्दी असल्यामुळे संजय राठोड आणि पत्नी शीतल राठोड यांना पुढे चालणेही कठीण होत होतं. त्यावेळी शीतल राठोड या स्वत: गर्दी पांगवत होत्या. प्रचंड गर्दी, त्यामध्ये तोंडाला मास्क आणि डोक्यावर तळपता सूर्य, त्यामुळे शीतल राठोड यांना भोवळ आली. (Maharashtra minister Sanjay Rathod at Pohradevi wife Sheetal Rathod feels dizziness)

संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्यात पत्नी शीतल राठोड यांनी खंबीर साथ दिल्याचं दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेल्या संजय राठोड यांची पहिली झलक प्रसारमाध्यमांनी टिपली, त्यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड होत्या.

यवतमाळ ते वाशिम प्रवास

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले नव्हते. राठोड काल यवतमाळ येथील त्यांच्या निवासस्थानी आले. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास राठोड निघाले, तेव्हा त्यांच्या लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीत ( MH 04 FB 567 ) पत्नी सोबत होती.

दोन तासांनी पोहरादेवी गडावर

 शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) वाशिममधील पोहरादेवी गडावर पोहोचले. जवळपास 15 दिवसांनी ते समोर आले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता वाशिममधील पोहरादेवी मंदिराकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही होत्या. दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले.

संबंधित बातम्या 

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | संजय राठोड पोहरादेवी गडावर, समर्थकांची प्रचंड गर्दी

Maharashtra minister Sanjay Rathod at Pohradevi wife Sheetal Rathod feels dizziness