Praful Patel : राज ठाकरे वाकरे ..त्यांनी ठरवायचं का माझ्या पक्षाचा नेता कोण ? प्रफुल पटेल भडकले

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत नेतृत्वाचा पेच निर्माण झाला आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. राज ठाकरे यांनी 'अध्यक्ष पाटील असावा, पटेल नाही' अशी भूमिका घेतली. यावर प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत तीव्र नाराजी व्यक्त करत, राज ठाकरेंचा माझ्या पक्षाशी काय संबंध, असा सवाल करत, पक्षाची जबाबदारी माझ्यावर असल्याचे स्पष्ट केले.

Praful Patel : राज ठाकरे वाकरे ..त्यांनी ठरवायचं का माझ्या पक्षाचा नेता कोण ? प्रफुल पटेल भडकले
राज ठाकरेंवर भडकले प्रफुल पटेल
| Updated on: Feb 03, 2026 | 2:36 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे अख्खा महाराष्ट्र हळहळला. त्यांच्या जाण्यानंतर कुटुंबाचं, पक्षाचं काय होणार ? पुढली वाटचाल कशी असणार ? असे अनेक प्रश्न होते. अजित पवार यांना जाऊन तीन दिवस झाले आणि चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष या पदासाठी प्रफुल पटेल स्पर्धेत असल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर मनसे अधअयक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत रोखठोक भूमिका मांडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

दरम्यान आज प्रफुल पटेल यांची पत्रकार परिषद झाली. तेव्हा त्यांनी अजित पवार यांचं निधन, त्यानंतरची पक्षाची अवस्था, जबाबदारी, विलीनीकरण, राष्ट्रीय अध्यक्ष कोण अशा सर्व मुद्यांवर विस्तर उत्तरं दिली. ज्या लोकांनी कधी निवडणूक लढवली नाही,. कधी लोकांनी त्यांना एक मतही दिलं नाही असे लोकं आम्हाला शिकवत आहेत,सल्ला देत आहेत असं पटेल म्हणाले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेबद्दल चारल्यावर तर पटेल संतापलेच. राज ठाकरे वाकरे ..माझा काय संबंध.. माझ्या पक्षाचा नेता कोण हे त्यांनी ठरवायचं का ? असा सवाल संतप्त पटेलांनी विचारला.

पक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावर

विधीमंडळ आणि राजकीय पक्ष असे दोन पार्ट आहे. विधीमंडळ हा पार्ट झाला आहे. केंद्रीय मंत्र्याला चुकून काही तरी माहिती दिली. त्यांना कुणी तरी चुकीची माहिती दिली असेल. पवार आणि अजितदादांसोबत मी काम केलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी माझ्यावरच राहिल. मी कार्यकारी अध्यक्ष आहे. विधीमंडळ आणि पक्षाचा विषय मार्गी लावण्याची जबाबदारी माझ्यावर आणि राज्यात तटकरेंवर आहे असं पटेल म्हणाले.

राष्ट्रवादीत कोणत्याही व्यक्तीने इंडिकेशनही दिले नाही. सर्वांच्या भावना समजतात तसा आम्ही सुनीता ताईंची निवड केली. पक्षाचा निर्णय हा प्रक्रियेनेच होणार आहे. कोणी तेलंगणनाचा वार आहे. कोणी अमूक कसं बनलं पाहिजे, असं सांगत आहे. काही लोकांनी कधी निवडणूक लढवली नाही. त्यांना कधी लोकांनी एक मतही दिलं नाही. ते लोक आम्हाला सल्ला देत आहेत. माझे वडील राज्यातून निवडून येत होते. मलाही महाराष्ट्राच्या जनतेने किती तरी वेळा निवडून दिलंय. आमच्या कुटुंबाबत आणि माझ्या बाबत कोणी बोलत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे असं पटेल म्हणाले.

राज ठाकरेंवरही कडाडले

राज ठाकरेंनी पटेलांना उद्देशून केलेल्या ट्विटचा उल्लेख करताच तर ते भडकलेच. ” राज ठाकरे वाकरे ..माझा काय संबंध. ते काय माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का. त्यांनी ठरवायचं का माझ्या पक्षाचा नेता कोण. विधीमंडळाचा नेता कोण. आम्ही काय राज ठाकरे इतर कुणाची सकाळची नऊची बुलेटिन आहे, तेलंगनाचा वार आहे हे लोक आम्हाला आमच्या पक्षात आम्ही काय करायचं सांगत आहे. ” अशा शब्दांत त्यांनी ठाकरे, संजय राऊत यांचा समाचार घेतला .

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

प्रफुल पटेल हे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी अर्थात राष्ट्रीय अध्यक्ष या पदासाठी स्पर्धेत असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या एका वक्तव्यामुळे गोंधळ सुरू झाला. गोयल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा दावा केला. यामुळे राजकीय वर्तुळात आणि विशेषतः दादांच्या राष्ट्रवादीमध्ये लगेचच खळबळ माजली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं. त्यांच्या ठाकरे शैलीत त्यांनी या मुद्यावर भाष्य केलं.

महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही ! – असं राज ठाकरे म्हणाले होते.