AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छगन भुजबळ यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे. या संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्रीगणेशा आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या 'प्राजक्त प्रभा' या काव्य संग्रहाचे प्रकाशनाने झाला.

छगन भुजबळ यांच्या हस्ते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या 'प्राजक्त प्रभा' काव्यसंग्रहाचे प्रकाशन
प्राजक्ता माळीच्या काव्य संग्रहाचे छगन भुजबळांच्या हस्ते प्रकाशन
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 11:26 PM
Share

नाशिक : साहित्य संमेलनाची सुरुवात प्राजक्त प्रभा कविता संग्रहाच्या प्रकाशन आणि काव्य वाचन कार्यक्रमातून होत आहे. या होणाऱ्या साहित्य संमेलनाचे आदरतिथ्य नाशिककर अतिशय उत्कृष्टपणे करतील असा विश्वास आहे. नाशिमध्ये होणारे हे साहित्य संमेलन अविस्मरणीय राहील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. (Release of actress Prajakta Mali’s ‘Prajakta Prabha’ collection of poems by Chhagan Bhujbal)

लोकहितवादी मंडळ, नाशिक आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत आहे. या संमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा श्रीगणेशा आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या ‘प्राजक्त प्रभा’ या काव्य संग्रहाचे प्रकाशनाने झाला. या काव्य संग्रहाचे प्रकाशन पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे पार पडले.

यावेळी खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील, मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर शिशोदे, संमेलनाचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर, प्रा.शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर, मुकुंद कुलकर्णी, खान्देश मराठा मंडळाचे सेक्रेटरी अविनाश पाटील, अशोक पाटील, मुलाखतकार स्वाती प्रभू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

काव्य वाचनाचा विक्रम करण्याचा निर्धार

यावेळी भुजबळ म्हणाले की, कोरोनामुळे साहित्य संमेलन पुढे पुढे जात होते. होईल की नाही याबाबत प्रश्न होता. मात्र सर्व नाशिक कर ठाम होते. त्यादृष्टीने होणारे साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्ट होईल. या संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील यासाठी प्रयत्न आहे. साहित्य संमेलनाची तयारी नाशिक कारांकडून अतिशय दर्जेदार करण्यात येत आहे. नाशिकच्या या संमेलनात काव्य कट्ट्यासाठी सुमारे साडे नऊशे हुन अधिक कवी सहभागी होणार असून काव्य वाचनाचा विक्रम करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यात आपण यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त करत यावेळी प्राजक्त प्रभा या कविता संग्रहातील काही कवितांचे वाचन त्यांनी यावेळी केले.

माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण- प्राजक्ता

यावेळी अभिनेत्री कवयित्री प्राजक्ता माळी म्हणाल्या की, माझ्या आयुष्यातील पहिलं कविता वाचन आज होत आहे. तसेच काव्य संग्रहाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन होत आहे. हा माझ्या आयुष्यातील अतिशय आनंदाचा क्षण आहे. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनास मराठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ मिळाले हे माझे भाग्य आहे. रसिकांचा मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार मानते असे त्यांनी यावेळी सांगत प्राजक्त प्रभा काव्य संग्रहाच्या प्रवासाचे वर्णन केले. यावेळी मराठी साहित्य मंडळाचे मिलिंद जोशी, खान्देश मराठा मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य प्रशांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

इतर बातम्या :

राज्य सरकार एसटीबाबत मोठ्या निर्णयाच्या तयारीत! संपावर तोडगा निघाला नाही तर खासगीकरणाचा विचार?

आटपाडी राडा प्रकरणात गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, कुठल्याही क्षणी अटक होणार?

Prajakta Mali Release of actress Prajakta Mali’s ‘Prajakta Prabha’ collection of poems by Chhagan Bhujbal

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.