AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौकशी काय, संजय गायकवाडांना थेट अटक करा..; कोर्टाच्या आदेशानंतर प्रशांत आंबी स्पष्टच बोलले..

प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने त्यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे. यानंतर प्रशांत आंबी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

चौकशी काय, संजय गायकवाडांना थेट अटक करा..; कोर्टाच्या आदेशानंतर प्रशांत आंबी स्पष्टच बोलले..
Prashant Ambi and Sanjay GaikwadImage Credit source: Instagram
| Updated on: May 24, 2026 | 2:31 PM
Share

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना न्यायालयाने झटका दिला आहे. संजय गायकवाड यांच्या पोलीस चौकशीला न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाण्यात गायकवाडांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला होता. मात्र आता न्यायालयाने चौकशीची परवानगी दिल्याने गायकवाडांच्या अडचणी वाढणार आहेत. याप्रकरणी प्रशांत आंबी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या अनेक दिवसांपासून मी दखलपात्र स्वरुपाची कलमं दाखल होण्यासाठी संघर्ष करत होतो. त्यामुळे न्यायालयाचे मी आभार मानतो. पोलिसांनी नि:पक्षपातीपणे तपासण करणं अपेक्षित आहे. पोलीस पानसरेंनाही न्याय देऊ शकले नाहीत”, असं ते म्हणाले.

“संजय गायकवाड यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे. त्यांचा ऑडिओ असल्याने आता चौकशी काय करणार? माझी राजारामपुरी पोलिसांना विनंती आहे की त्यांनी थेट गायकवाडांना अटक करावी. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचं धाडस वाढलं आहेत. मीडियाने प्रकरण उचलून धरल्यापासून धमक्यांना सुरु झाली आहे. गायकवाडांच्या समर्थकांकडून मला धमक्या दिल्या जात आहेत, शिवीगाळ केली जात आहे. कुठे फिरतो, कुठे उठतो-बसतो या सगळ्या गोष्टींवर आम्ही लक्ष ठेवून असल्याची धमकी मला मिळाली.  न्यायालयाने चौकशीची परवानगी दिली तरी पुढे काय होईल, हे मला माहीत नाही. परंतु जोवर कठोर कारवाई होत नाही, तोवर ही लढाई सुरू राहील,” असे आरोप आंबी यांनी केले आहेत.

‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून संजय गायकवाड यांनी फोन करून प्रशांत आंबी यांना प्रचंड शिवीगाळ केली होती. तसंच पुस्तक छापल्यास घरी येऊन मारेन, अशी धमकीही त्यांनी दिली होती. संजय गायकवाड यांच्या या फोन संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर प्रचंड गदारोळ झाला होता.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ