AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेग्नंट बायकोवर खरातने केले अत्याचार, पतीला कळताच… हादरवणारा कांड समोर

सध्या नाशिक पोलिसांची विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. खरातच्या नेटवर्कमधील राजकीय-प्रशासकीय संबंध, अंधश्रद्धेचा गैरवापर आणि महिलांच्या शोषणाच्या पद्धती उघड होत आहेत.

प्रेग्नंट बायकोवर खरातने केले अत्याचार, पतीला कळताच... हादरवणारा कांड समोर
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 23, 2026 | 6:27 PM
Share

नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी, ‘कॅप्टन’ आणि भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळ, बलात्कार आणि महिलांचे शोषण यासंबंधीचे आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, खरातच्या कथित ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली चालणाऱ्या अंधश्रद्धा आणि शोषणाच्या साम्राज्याचा पोल खोल झाली आहे. एका गर्भवती महिलेच्या पतीला जेव्हा कळाले की त्याच्या पत्नीसोबत खरातने नको ते केले. त्यानंतर त्याने मोठे पाऊल उचलले.

प्रकरणाची सुरुवात कशी झाली?

१७ मार्च रोजी अशोक खरात विरोधात पहिला गुन्हा दाखल झाला. एका विवाहित महिलेने अशोक खरात यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्री उशिरा गुप्तपणे त्याच्या निवासस्थानी छापा टाकला आणि अटक केली. अनेक राजकीय नेत्यांशी हितसंबंध असलेल्या खरातला अटक करताना पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली होती. रविवारी आणखी दोन महिलांनी खरातविरोधात तक्रार दाखल केली. यातील एका घटस्फोटित महिलेची तक्रार तर दुसरी २०२३ मधील एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेची आहे. या तक्रारींनंतर खरातच्या अघोरी साम्राज्याचा पर्दाफाश कसा झाला, हे आता स्पष्ट होत आहे.

पर्दाफाश कुणी केला? नेमके काय घडले?

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, खरातचा मुख्य पर्दाफाश त्याच्या एकेकाळच्या अगदी जवळच्या आणि निस्सीम भक्त असलेल्या व्यक्तीने केला. ही व्यक्ती खरातच्या वाईट कृत्यांना साथ देत होती आणि त्यामुळे तो बराच काळ सुरक्षित राहिला होता. पण एका घटनेने सगळे उलटे झाले. २०२३ मध्ये ही व्यक्ती आपल्या सात महिन्यांच्या गरोदर पत्नीला घेऊन खरातकडे आली. प्रसूती सुरक्षित व्हावी, बाळाला चांगली संतती मिळावी यासाठी पूजा-विधी करायचे असल्याचे सांगून खरातने या व्यक्तीला केबिनच्या बाहेर बसवले. प्रभावाखाली असलेल्या व्यक्तीने बाहेर जाणे पसंत केले.

पण केबिनमध्ये लाइट बंद करून खरातने त्या गरोदर महिलेवर हात टाकला, अश्लील कृत्ये केली आणि तिचे लैंगिक शोषण केले. बाहेर आल्यानंतर महिलेच्या पतीला हा प्रकार सांगितला गेला. सुरुवातीला विश्वास बसला नाही, पण तिने आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेतल्यावर सत्य समजले.

इथून सुरू झाला खरातच्या साम्राज्याचा अंत

या घटनेनंतर संबंधित व्यक्तीने खरातच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. संशय बळावल्यानंतर त्याने खरातच्या ऑफिस/केबिनमध्ये छुपे कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांद्वारे केबिनमधील अनेक लैंगिक छळाचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केले. हे सर्व पुरावे एका पेनड्राइव्हमध्ये घेऊन त्याने नाशिक पोलिसांकडे सादर केले. व्हिडीओ पाहून पोलिसांनाही धक्का बसला. या पुराव्यांमुळे खरातच्या साम्राज्याला सुरुंग लागला आणि एकापाठोपाठ गुन्हे दाखल होऊ लागले.

Follow Us
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू; आणखी विलंब होण्याची...
20 तासांपासून लालबागच्या राजाची मिरवणूक सुरू... आणखी विलंब होण्याची शक्यता, नेमकं कारण समोर
गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
आजच्या मोहिमेत जवळपास 3 हजार... गणेशोत्सव आणि विसर्जनाबाबत अमृता फडणीसांचं मोठं विधान
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना..
जयघोष, फुलांची उधळण अन् भक्तांची गर्दी; लालबागच्या राजाच्या विसर्जना आणखी उशिर
मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
Lalbag Cha Raja : मुंबई गणेश विसर्जन 2026 लालबागचा राजा, गिरगावचा राजा मिरवणूक
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप