AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरोदर महिलेवर पाशवी अत्याचार, नंतर हातोड्याने संपवलं, भयानक खुनामुळे बारामतीत एकच खळबळ!

Pregnant woman death case in baramati: बारामतीत एका नराधमाने गरोदर महिलेसोबत अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारलं. ही क्रूर घटना समोर येताच नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण तयार झालं आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

गरोदर महिलेवर पाशवी अत्याचार, नंतर हातोड्याने संपवलं, भयानक खुनामुळे बारामतीत एकच खळबळ!
pregnant woman death case in baramatiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 14, 2026 | 5:23 PM
Share

बारामती तालुक्यातील अनैतिक संबंधातून 19 वर्षांच्या तरुणाने डोक्यात गोळी झाडून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, आता परिसरातून आणखी एक सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. विकृतीच्या सर्व सीमा ओलांडत एका गरोदर महिलेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका पुन्हा एकदा दहशतीखाली आला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पणदरे एमआयडीसी परिसरात घडलेल्या या प्रकरणात माळेगाव पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांच्या आत नराधमाला मुसक्या आवळून गजाआड केले आहे.

हातोड्याने हल्ला, अत्याचार अन् गळा आवळून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, पणदरे एमआयडीसी परिसरात एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिची हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. संशयावरून गणेश रामचंद्र माने या 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने या पाशवी कृत्याची कबुली दिली. आरोपीने आधी महिलेवर हातोड्याने वार करून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची गळा आवळून हत्या केली. वैद्यकीय तपासणीदरम्यान मृत महिला गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे.

मुद्देमाल जप्त करुन आरोपी पोलीस कोठडीत

गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी तपासाचा वेग वाढवत आरोपीकडून मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे डोरले आणि पैजण जप्त केले आहेत. याशिवाय हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि रक्ताने माखलेले आरोपीचे कपडेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपी गणेश माने याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणाचा पुढील तपास माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ करत आहेत. एकापाठोपाठ घडणाऱ्या या थरारक घटनांमुळे बारामतीत खळबळ उडाली असली, तरी अवघ्या दोन तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड करणाऱ्या माळेगाव पोलिसांच्या कौशल्याचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow Us
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बा
मराठमोळ्या अभिनेत्याच्या घरी सुरेख डेकोरेशन; सामाजिक संदेश देत केलं बाप्पांचं स्वागत
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी..
विनयभंगाच्या तक्रार प्रकरणी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाडांची मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा, भारतीय भाषांच्या गौरव...
देवेंद्र फडणवीस यांचा राजभाषा दिनी मातृभाषा आणि भारतीय भाषांच्या गौरवाचा संदेश
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजभाषा...
अमित शहा, फडणवीस, शिंदे अन् सुनेत्रा पवार एकाच मंचावर; वाशीत राजभाषा संमेलनाचा थाट!
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत...
अखेर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात CBI FIR दाखल; संशयितांच्या यादीत मोठी नावे