शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात चक्काजाम

| Updated on: Feb 06, 2021 | 2:19 PM

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात चक्काजाम, शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षांचाही सहभाग(Protest across the state for support farmer)

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात चक्काजाम
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यात चक्का जाम आंदोलन
Follow us on

मुंबई : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज राज्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षांचाही सहभाग होता. पुणे नाशिक महामार्गावर मोशी येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास चक्का जाम आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी नाशिक-पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात शेतकरी संघटनासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे त्वरीत मागे घेण्यात यावे अशी मागणी यावेळी या आंदोलकांनी केली.(Protest across the state for support farmer)

वर्ध्यात काय झालं?

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात पवनार येथील चौरस्ता शेतकऱ्यांनी रोखला. वर्ध्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी गेल्या 53 दिवसापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समितीतर्फे आज शेतकरी पवनार येथे रस्त्यावर उतरलेत. हातात तिरंगा झेंडा घेऊन चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात महिलांही सहभागी झाल्या आहेत. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोको दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागपूर – तुळजापूर महामार्गही शेतकऱ्यांनी रोखून धरला.

विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ताफा याच मार्गाने वर्ध्यात पोहचला होता. नितीन गडकरी यांच्या दौऱ्यामुळे रास्ता रोको आंदोलन चांगलेच चर्चेत आले. आज वर्ध्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री बच्चू कडू, पालकमंत्री सुनील केदार आदी मंत्री आहेत. पवनार येथील शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोने मंत्र्यांसह प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अर्धा तास चाललेल्या आंदोलनानंतर शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.(Protest across the state for support farmer)

सांगलीत काय आहे परिस्थिती?

सांगलीत कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. तसेच मिरज – पंढरपूर हायवेवरही तासगाव फाट्याजवळ रास्ता रोको करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरमध्ये चक्का जाम आंदोलनापूर्वी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठी गर्दी झाली. बाळे येथील रस्त्यांच्या कामामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. सावळेश्वर येथे शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन होणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना गाडी बाहेर काढताना मोठी दमछाक झाली.(Protest across the state for support farmer)

इतर बातम्या

पृथ्वीराज चव्हाणांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर

(Protest across the state for support farmer)