Raj Thackeray Bail | वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर

Raj Thackeray Bail | वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जामीन मंजूर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Raj Thackeray Bail | वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर
राज ठाकरे यांना जामीन मंजूर
Follow us
| Updated on: Feb 06, 2021 | 1:18 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या वकिलांची फौज सोबत होती.  नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं होतं.  राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे. राज ठाकरेंना 15 हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे.   (MNS Chief Raj Thackeray got bail from Vashi Court in Toll Plaza case)

राज ठाकरेंसोबत वकिलांची फौज

राज ठाकरे वाशी कोर्टाच्या दिशेने निघालेले आहेत. 2014 मध्ये वाशी टोलनाक्यावर तोडफोड झाली होती. राज ठाकरेंना यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढलं गेलं. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते. राज ठाकरेंना वॉरंट काढल्यानं मनसेचे कार्यकर्ते वाशी टोलनाका परिसरात जमा झालेले पाहायला मिळाले.

राज ठाकरेंचे वकील काय म्हणतात?

मनसे प्रमुख राज ठाकरेंना जानेवारी महिन्यात वॉरंट बजावण्यात आलं होतं. मनसेच्या विधी व न्याय विभागाची फौज वाशी न्यायालय परिसरात दाखल झाले आहे. राज ठाकरेंना जामीन मंजूर होणार असल्याचं आशा अ‌ॅड. रविंद्र पाष्टे यांनी सांगितलं होतं. मनसेच्या विधी विभागाचे वकील मोठ्या संख्येने वाशी न्यायालय परिसरात उपस्थित होते.

राज ठाकरेंच्या भाषणानंतर टोलनाक्याची तोडफोड

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

मनसैनिकांकडून ग्रँड वेलकम

राज ठाकरे येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ग्रँड वेलकम करण्याचं ठरवलं आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे येत असल्याने याचा राजकीय फायदा नक्कीच मनसेला होईल अशी आशा मनसैनिकांना वाटते.

संबंधित बातम्या: 

Video: टीम इंडियाला झोडपणाऱ्या रुटच्या मदतीला जेव्हा विराट धावला

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण, राज ठाकरे कोर्टात हजर राहणार

(MNS Chief Raj Thackeray got bail from Vashi Court in Toll Plaza case)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.