AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परळीत गाडी अडवली, आंदोलकांनी दगड उचलले; सुरेश धसांचा संताप, म्हणाले मी आता..

आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.

परळीत गाडी अडवली, आंदोलकांनी दगड उचलले; सुरेश धसांचा संताप, म्हणाले मी आता..
| Updated on: Feb 22, 2025 | 6:10 PM
Share

आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं. सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत, असा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. शिरसाळा गावात आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले, तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली, आता यावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस?  

लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी करावा. मात्र पोलिसांसमोर दगड उचलण्याची मजल या लोकांची जाते. माजी पालकमंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील आणि दुसऱ्या मंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील हे लोक कसे वागतात. असं म्हणत त्यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि पकंजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पाच टर्म आमदार राहिलो आहे, एकदा राज्यमंत्री होतो तरीही माझ्या गाडीसमोर अशी पोरकट लक्षणं हे लोक करतात. हे दगड घेऊन मला मारणार होते का? ते दगड घेऊन मला मारणार नाहीत. मात्र आम्ही यांच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठीची ही स्पर्धा आहे. मात्र ही गुंडगिरी, दहशत संपवण्यासाठी मी आता राजकारणात उतरलो आहे. शिरसाळ्यात जे मार्केट कमिटीने गाळे काढले ते गायरान जमिनीवर काढले.  रस्त्यावर निषेध करायला जे लोक आले ते हे गाळेधारक असावेत किंवा बेकायदेशीर वीटभट्टीवाले असावेत, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं. यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्यानं सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत, मात्र दुसरीकडे सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मनोज जरांगे पाटील हे आमचे दैवत आहेत, मी त्यांच्यावर काहीही बोलणार नाही, असं धस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!