Pune News : मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय

ATS Pune Police Search Operation : पुणे शहरातील कोंढवा परिसरात बुधवारी मध्यरात्रीपासून एटीएसकडून सर्च ऑपरेशन राबण्यात आलं आहे. तसेच काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

Pune News : मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय
पुण्यातील कोंढव्यात एटीएसचं सर्च ऑपरेशन
| Updated on: Oct 09, 2025 | 10:09 AM

पुणे शहरात काल (बुधवार) मध्यरात्रीपासूनच मोठ्या घडामोडी घडत आहे. काल रात्रीपासून पुण्यातील कोंढवा भागात ATSचं सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांसह हे संयुक्त सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. महाराष्ट्र पोलिस, पुणे पोलिस आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा मिळून हे संयुक्त ऑपरेशन (search operation)सुरू केलं. या सर्च ऑपरेशनदरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या कारवाईमुळे पुण्यात तसेच राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

कोंढवा परिसरात संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले होते. पुणे पोलिस आणि एटीएसचे जवळपास 350 कर्मचारी पुण्यातील कोंढवा भागात तैनात करण्यात आले आहेत. 25 ठिकाणी पोलिस व एटीएस अधिकाऱ्यांकडून हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. ही मोहीम संशयितांच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असण्याची शक्यता आहे, अशी माहितीदेखील समोर येत आहे.

 

कोंढवा परिसराला छावणीचं स्वरूप

बुधवार रात्रीपासूनच पुण्यातील कोंढवा भागाला छावणीचं स्वरूप आलं आहे. देशविरोधी कारवाई होणार असल्याचे इनपुट्स पुणे पोलिस आणि एटीएसला मिळाले होते. त्याच पार्श्वभूमीवर एटीएस अधिकारी आणि पुणे पोलिसांनी कोंढवा भागात ही संयुक्त कारवाई सुरू केली. तसेच हीच कारवाई पिंपरी-चिंचवडमध्ये देखील सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कोंढवा भागातातल विविध 25 ठिकाणी एटीएस अधिकारी आणि पोलिसांनी छापेमारी केली, काही संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यापैकी काही जणांची कसून चौकशी देखील करण्यात आली.

दोन वर्षांपूर्वी याच कोंढवा परिसरातून संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.आणि पुन्हा एकदा देशविरोधी कारवाई करण्यासाठी काही संशयित तयारी असल्याते एटीएस व पोलिसांना समजलं, त्यात पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू असून कोंढव्यातील जवळपास 25 ठिकाणी एटीएस अधिकारी सर्च ऑपरेश राबवत आहेत. शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर तपशील अधिकृतरीत्या जाहीर केला जाईल, असं पोलिस सूत्रांनी सांगितलं.