AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात भयंकर घडलं! प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला संपवलं, प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याची हत्या

Pune Crime : पुण्यात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. आईनेच आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यात भयंकर घडलं! प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने पोटच्या गोळ्याला संपवलं, प्रियकराच्या मदतीने चिमुकल्याची हत्या
Crime Mother Killed BabyImage Credit source: Google
| Updated on: Apr 10, 2026 | 7:26 PM
Share

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याची प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळेच या निष्पाप मुलाचा जीव घेतल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. यामुळे आरोपी आई आणि तिच्या प्रियकराला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

खेड तालुका हादरला

खेड तालुक्यातील कुरुळी येथे घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. आवेज मेहबुब शेख हा चिमुकला अवघ्या सहा वर्षांचा होता. त्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आला. आवेज आपली आई बसरीन शेख सोबत भाड्याच्या घरात राहत होता. मात्र आईचे तिच्या प्रियकर राम कजेवाड सोबत असलेले संबंध या चिमुकल्यासाठी जीवघेणे ठरले आहेत. या दोघांनी त्याची हत्या केली.

कशी केली हत्या?

समोर आलेल्या माहितीनुसार रात्री साडे अकराच्या सुमारास आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून आवेजला बाथरूममध्ये नेलं. तिथे पाण्याच्या बादलीत त्याचं डोकं बुडवून धरलं आणि त्यानंतर भिंतीवर आणि जमिनीवर डोकं आपटत त्याची निर्दयी हत्या करण्यात आली. यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी थरारक प्लॅन रचला. मृतदेह कारमधून बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथे नेण्यात आला आणि मुलाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र नातेवाईकांना संशय आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आईला ताब्यात घेतलं. चौकशीत बसरीन शेखने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

निर्दयी आईला अटक

पोटच्या गोळ्याची हत्या केल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आली असून तिचा फरार प्रियकर राम कजेवाडचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आईनेच आपल्या लेकराचा जीव घेतल्याच्या या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. समाजात नातेसंबंधांची किंमत कमी होत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच