AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात लॉजमध्ये सापडला महिलेचा संशयास्पद मृतदेह, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहेत. आता देखील एका महिलाचा मृतदेह लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळे, खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठी माहिती दिला आहे.

पुण्यात लॉजमध्ये सापडला महिलेचा संशयास्पद मृतदेह, पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
| Updated on: May 17, 2026 | 9:26 AM
Share

एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यात महिलांची सुरक्षेचा तर फार मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. आता देखील एक घटनेचा थरार समोर आला आहे. एका 31 वर्षीय महिलाचा मृतदेह लॉजमध्ये संशयास्पद आवस्थेत आढळल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे… याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, पुणे आता सुरक्षित राहिलं आहे का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे एका लॉजमध्ये 31 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्नेहल अमोल शिंदे असं मृत महिलेचे नाव आहे. स्नेहल हिच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओतूर येथील वाघिरे महाविद्यालयासमोर असलेल्या अमृत लॉजमध्ये स्नेहल शिंदे हिचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पाहणी केली. त्यानंतर स्नेहल हिला ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर महिलेला मृत घोषित केलं. आता महिलेचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झाला याचा अधित तपास पोलीस करत आहेत.

घडलेल्या या भयानक घटनेमुळे ओतूर परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून, मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  तर हा मृत्यू नैसर्गिक आहे की, अन्य काही कारणांमुळे झाला, याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. घटनास्थळावरील परिस्थिती, लॉजमधील नोंदी तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी यावरून पुढील तपासाची दिशा निश्चित केली जाणार आहे… असं देखील पोलीस म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहल हिला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. आता स्नेहल हिच्या मृतदेहाचं नेमकं कारण काय? हे जाणून घेणं महत्त्वाचं  ठरणार आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?