AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Everyone Sorry… मोबाईल स्टेट्सवर अखेरचा मेसेज, काळजाचा थरकाप उडाला; त्यानंतर जे घडलं…

पुण्यातील 27 वर्षीय अमर कदम यांचा 'एव्हरीवन सॉरी' स्टेटस ठेवल्यानंतर मृतदेह वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळला. खडकी येथून बेपत्ता झालेल्या या तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आत्महत्येचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असून, आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Everyone Sorry... मोबाईल स्टेट्सवर अखेरचा मेसेज, काळजाचा थरकाप उडाला; त्यानंतर जे घडलं...
मोबाईल स्टेट्सवर अखेरचा मेसेज ठेवत तरूणाने..
| Updated on: Apr 24, 2026 | 2:07 PM
Share

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील खडकी येथून दोन दिवसापासून गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. राजगडच्या वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाने दोन दिवसापूर्वी मोबाईलवर Everyone Sorry असा मेसेज ठेवला होता. त्यानंतर तो अचानक गायब झाला. त्यामुळे सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला होता. त्याची शोधाशोध सुरू होती. त्यानंतर त्याचा थेट मृतदेहच आढळल्याने सर्वच हादरून गेले आहेत.

पुण्यातील खडकी येथून गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा, राजगड तालुक्यातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मृतदेह आढळला. अमर राजेंद्र कदम (वय 27) असं या युवकांच नाव आहे. हा तरुण गायब झाल्यानंतर खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली असता त्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं?

पुण्यातील खडकीतील अमर राजेंद्र कदम (वय 27) हा युवक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत खडकी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती साईव खुर्द येथील पोलीस पाटील रुपाली पंडीत यांनी संबंधित यंत्रणांना दिली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. अध्यक्ष तानाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली टीम घटनास्थळी दाखल झाली. प्राथमिक पाहणीत संबंधित ठिकाणी पाण्याचा खोल प्रवाह असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार तातडीने शोधमोहीम राबविण्यात आली.

साईव खुर्द परिसरातील वरसगाव धरणाच्या बॅकवॉटर भागात त्यांचे ओळखपत्र, कपडे, मोबाईल आदी वस्तू आढळून आल्याने हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं होतं. त्यानंतर या टीमने खोल पाण्यात शोध घेतला. यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला. त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याने ‘Everyone Sorry’ असा स्टेटस मोबाईलवर ठेवला असल्याची माहितीही समोर आली आहे. यावरून अमरने आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊनच आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याच्या आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या कारवाईत पोलीस कर्मचारी अनिकेत सोनवणे, निवास जगदाळे, मंगेश कदम यांच्यासह हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गणेश सपकाळ, संजय चोरघे, नारायण जावळकर, संतोष भगत आदींनी सहभाग घेतला. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल...
ममता बॅनर्जींना लोक घरी बसवणार, मोठ्या नेत्याचं भाकीत, पश्चिम बंगाल....
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान
महाडमध्ये अवकाळी पावसाचा कहर; वादळी वाऱ्यामुळे मालमत्तेचं नुकसान.
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी...
खरातला मदत करणाऱ्या डॉक्टरांचं काही खरं नाही, गर्भपातासाठी....
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?
पुरोगामी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील घुसखोर कोण?.
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली
तुम्ही टुकार माणूस आहात... मराठी सक्तीवरून मनसे आणि शिंदे गटात जुंपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोलकात्यातील हुगळी नदीत नौकविहार, व्हायरल.
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले
मविआकडून उद्धव ठाकरेंना विधानपरिषदेची ऑफर?; संजय राऊत स्पष्टच बोलले.
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये पोलिसांची अचानक धाड, लॅपटॉप, वाय-फाय जप्त, नेमकं काय घडलं?.
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह
मराठी सक्तीवर थेट बाळासाहेबांचा दाखला, राऊतांनी शिंदे गटाला घेरलं, म्ह.
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम
धमकी देणाऱ्या भैय्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ, मनसेचा खरमरीत दम.