AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे हादरलं! नसरापूरनंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार, काय घडलं?

पुण्याच्या सोरतापवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उरुळी कांचन पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पुणे हादरलं! नसरापूरनंतर पुन्हा अल्पवयीन मुलीवर नराधमांचा अत्याचार, काय घडलं?
crime
| Updated on: May 08, 2026 | 9:09 AM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्यातील नसरापूर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच आता सांस्कृतिक माहेरघर पुण्याची माणुसकी पुन्हा हरवली आहे. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी सोरतापवाडी परिसरातील एका नर्सरीमध्ये काम करते. आरोपी आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे हे गेल्या काही दिवसांपासून या मुलीचा पाठलाग करत होते. तिला वारंवार गाठून मानसिक त्रास देणे आणि छेडछाड करण्याचे प्रकार सुरू होते. पीडित मुलगी ही नर्सरीच्या परिसरात असताना या दोन्ही नराधमांनी तिला गाठले. तिला बळजबरीने एका निर्जनस्थळी मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेले. तेथे मदतीसाठी ओरडण्याची संधी न देता या दोघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

पीडितेने या घटनेची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल केला. आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सापळा रचून आकाश ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

आरोपीची सखोल चौकशी सुरु

दरम्यान पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना घडली होती. एका ६५ वर्षीय नराधमाने कुटुंबाच्या ओळखीचा फायदा घेत अवघ्या ४ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्या केली. आरोपीने केवळ कृत्य करूनच थांबला नाही, तर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा नराधम ओळखीचाच निघाल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचा प्राथमिक वैद्यकीय आणि शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यातून आरोपीच्या क्रूरतेची भीषणता स्पष्ट झाली आहे. अहवालानुसार, अत्याचार करताना नराधमाने चिमुरडीच्या घशात जबरदस्तीने मोजा कोंबल्यामुळे तिचा श्वास रोखला गेला आणि गुदमरून तिचा मृत्यू झाला. बालिकेच्या शरीरावर बोथट किंवा टणक वस्तूने केलेल्या वारामुळे अनेक जखमा झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. या जखमा नेमक्या कशाने केल्या, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता आरोपीची सखोल चौकशी करत आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?