2 दिवसांत पोलीस येतील, लाठीचार्ज होईल, तुम्ही…; MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांसमोर काँग्रेस खासदारानं व्यक्त केली शंका
Praniti Shinde On Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनात प्रणिती शिंदेंचा आक्रमक सूर पाहायला मिळाला आहे. त्यांनी MPSC विद्यार्थ्यांना लढण्याचं आवाहन केलं आहे.

जंतर मंतर येथे आंदोलनासाठी जात असताना ताब्यात घेतल्यानंतर दोन तासांनी दिल्ली पोलिसांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांची सुटका केली. गेल्या २४ तासांत दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दोनदा ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले आहे. यानंतर खासदार प्रणिती शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी पुण्यातील आंदोलनावर भाष्य केले आहे. तुम्ही गांधींच्या विचारांचा डीएनए बदलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते होऊ देणार नाही. मी पोलिसांना पाहिले तेव्हा मला असे वाटले की ते आपल्या आंदोलनात बसले आहे. हे सरकार अहंकारी आणी निगरगट्ट आहे, असं त्या म्हणाल्या आहेत. तसेच त्यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, 2 ते 3 दिवसात पोलीस येणार. तुमच्यावर लाठीचार्च होणार. पण तुम्ही लढा. परवानगी असतानाही अटक करतात. आपली थोडीशी लढाई राहिली आहे. पहिली विकेट गेली आता ही पण जाणार आहे. पहिली जंतयमंतरला गेली. आता दुसरी विकेट आपल्या महाराष्ट्रात जाणार आहे. भिमनवार छोटे मासे आहेत. शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे. एसआयआरमध्ये 13 कोटी नाव डिलिट केले आहेत. या देशाचा डीएनए गांधींच्या विचारांचा आहे. त्यांचा डीएनए संविधानाचा आणि सर्वधर्म समभावाचा नाही आहे, असं त्यांनी सांगितलं.
त्या म्हणाल्या की, काही झाले तरी तर मागे हटायचे नाही. अजुनही पंचनामे झाले नाही. मागच्या अतिवृष्टीचे पैसे दिले नाही. शेतकरी कामगार, महिलांवर अत्याचार सुरू आहे. मी इथे आले तेव्हा तुम्हाला बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं. युवाशक्ती दाखवून देईल लोकशाही कायं असते. लोकशाही पुढे सगळ्यांना झुकावे लागते. पोलिसांना बघून मला समजेना. ते आपल्यात सामील होयला आले की अटक करायला? हे सरकार निगरगट्ट आहे.2 दिवसात पोलीस येतील. लाठीचार्ज होईल. घ्या अंगावर. लढा. ह्या लढाईत तुमचा सिंहाचा वाटा असणार आहे, असं आवाहन प्रणिती शिंदेंनी केलं आहे.
प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मी पण एमपीएससी करत होते. जमलं नाही. मग लॉ केलं. तिकडे शेतकऱ्याचा अंत बघताय. इथे विद्यार्थ्याचा बघताय. तुम्ही आणि तुमचं भाजप गेलं खड्डयात. एसआयआरमार्फत तुम्ही देशाचा डीएनए बदलायला बघत आहात. ह्या भाजपच्या विचारसरणीमुळे इंजिनियर, डॉक्टर नाहीतर अतिरेकी तयार होतील. एफआयआर करु दे. एफआयआर मागे घेण्याची ताकत सुद्धा आपल्यात आहे. हे विसरू नका.
त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. पॅकेज मागायला. अजून अतिवृष्टीची मदत झाली नाही. संविधानची शपथ घेऊन तुम्ही इथे आला आहे. कुणासमोर झुकायचं नाही. अधिकाऱ्यांचं दोष नसतो. ते दबावाखाली काम करतात. पण आता फिरलंय. भीमनवारची विकेट घेणार म्हणजे घेणार, असा थेट इशारा प्रणिती शिंदेंनी दिला आहे.