AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात चाललंय काय? नामांकित शाळेत 3 वर्षांच्या मुलासोबत घडला भयंकर प्रकार, शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा 

पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिक्षिकने तीन वर्षांच्या मुलाला बाथरुममध्ये कोंडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यात चाललंय काय? नामांकित शाळेत 3 वर्षांच्या मुलासोबत घडला भयंकर प्रकार, शिक्षिकेसह व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा 
pune police Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 13, 2026 | 9:15 AM
Share

पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील घोरपडी परिसरात असलेल्या एका नामांकित शाळेत तीन वर्षांच्या चिमुरड्याला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्याच्यासोबत क्रूर वर्तन केल्याचा देकील आरोप आहे. मुंढवा पोलीस स्टेशन परिसरात संपूर्ण प्रकार घडला. यानंतर पोलिसांनी शाळेच्या शिक्षिका आणि व्यवस्थापिकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

मनिता अस शिक्षिकेचे तर सोनाली असे व्यवस्थापिकेचे नाव आहे. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोरपडी भागात असलेल्या बी. टी. कवडे रोडवर असलेल्या या शाळेत 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11.15 ते 2.15 या वेळेत ही घटना घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने पोलिसांकडे तक्रार दिली. शिक्षिकेने मुलाला बाथरूममध्ये कोंडल्याचा आरोप करण्यात आलाय. तक्रारीनंतर 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.56 वाजता मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रणजित म्हस्के यांनी महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, तीन वर्षांच्या मुलाला बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याची तक्रार आईने दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.  पोलिसांनी शाळा प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले आहेत. शाळा प्रशासनाने फुटेज मिळवून देण्याचे सांगितलंय. मात्र नंतर ते मिळू शकले नसल्याचे कळवलं, असे म्हस्के यांनी सांगितलं.

मंगळवारी डीव्हीआर जप्त करणार

पोलीस मंगळवारी शाळेचा डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर (डीव्हीआर) जप्त करण्यात आला आहे. तो आता न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.  या तपासणीत व्हिडिओमध्ये काही आढळल्यास गुन्ह्यात अतिरिक्त कलमे समाविष्ट करण्यात येतील, असे म्हस्के यांनी सांगितलंय. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(२), ३(५) तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ च्या कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने पालकांमध्ये भीती पसरली असून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान