AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विभागातील अनेक रेल्वे गाड्या रद्द, कोणत्या पर्यायी मार्गाने वळवल्या? वेळापत्रकातही महत्त्वाचा बदल

पुणे विभागातील अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या ट्रेन कोणत्या पर्यायी मार्गाने वळवल्या, जाणून घ्या.

पुणे विभागातील अनेक रेल्वे गाड्या रद्द, कोणत्या पर्यायी मार्गाने वळवल्या? वेळापत्रकातही महत्त्वाचा बदल
Railway Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 8:35 AM
Share

पुणे विभागातील रेल्वेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कामासाठी पुणे आणि हडपसर यार्डात काम सुरू आहे. या कामाचा परिणाम शनिवारी आणि रविवारच्या रेल्वे वाहतुकीवर होणार आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत अनेक लांब पल्ल्यांच्या गांड्याचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तसेच मोठया संख्येने गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता पुण्याऐवजी खडकी, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, सातारा, जेजुरीपर्यंत धावणार असल्याची माहिती हाती आली आहे.

रेल्वेने हाती घेतलेल्या कामामुळे पुणे-नागपूर, पुणे-सोलापूर, नागपूर-पुणे, पुणे-बीड, अमरावती-पुणे यांसह पुणे-दौंड आणि पुणे-बारामती मार्गावरील डेमूच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या कामाचा रविवारी धावणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे. रविवारच्या दिवशी पुणे–मुंबई एक्स्प्रेससह पुणे–सोलापूर, पुणे–कोल्हापूर, पुणे–शिर्डी, पुणे–नागपूर आणि पुणे–अमरावती या मार्गावर परिणाम होणार आहे. पुणे-लोणावळा उपनगरीय सेवांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. पुणे विभागातील लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. चेन्नई-एलटीटी, पुणे–हावडा, हावडा–पुणे, निजामुद्दीन–वास्को-द-गामा आणि चंदीगड–यशवंतपूर एक्स्प्रेस या गाड्या पर्यायी मार्गाने धावणार आहेत.   त्यामुळे काही गाड्यांना पुणे, लोणावळा, दौंड, सांगली, सातारा इत्यादी स्थानकांवर थांबा मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे विभागातील कामामुळे काही गाड्यांचा प्रवास खडकी किंवा दौंड येथेच थांबवण्यात येणार आहे. इंदूर,दौंड, जोधपूर-हडपसर, जयपूर-पुणे एक्स्प्रेस खडकीपर्यंत धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, राणी कमलापती-पुणे एक्स्प्रेस आणि बारामती-डेमूचा प्रवास दौंडपर्यंत मर्यादित करण्यात आलाय. तर हडपसर-जोधपूर एक्स्प्रेससह काही गाड्या खडकीहून सुरू करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, पुणे-दानापूर अमृत भारत एक्स्प्रेस 3 ऑक्टोबर रोजी 15.25 ऐवजी 16 वाजता सुटेल. तर पुणे-दानापूर विशेष गाडी 3 ऑक्टोबर रोजी 4 तास 5 मिनिटांनी सोडण्यात येईल. तर 4 ऑक्टोबर रोजी 7 तास 40 मिनिटे उशिराने सुटणार असल्याची माहिती हाती आली आहे. हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाशी ही विशेष गाडी देखील 4 ऑक्टोबर रोजी अडीच तास उशिराने सुटणार आहे. पुणे–जम्मू तवी झेलम आणि पुणे–हावडा आझाद हिंद एक्स्प्रेसच्या ३ ऑक्टोबरच्या वेळेत बदल करण्याचा पूर्वीचा प्रस्ताव रेल्वेने रद्द केला  आहे. आता या दोन्ही गाड्या निर्धारित वेळेत धावणार आहेत.

Follow Us
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन