‘पादचारी दिन’ साजरा करणारं पुणे देशातील पहिलं शहर ठरणार! महापौरांची घोषणा

| Updated on: Oct 05, 2021 | 7:39 PM

पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, त्याचं महत्व समजावं, या उद्देशानं पुणे महापालिका लवकरच पादचारी दिन साजरा करणार आहे. तशी घोषणा आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलीय.

पादचारी दिन साजरा करणारं पुणे देशातील पहिलं शहर ठरणार! महापौरांची घोषणा
पुणे महापालिका बैठक
Follow us on

पुणे : देशात अनेक ‘दिन’ साजरे केले जातात. त्यात आता अजून एका दिनाची भर पडणार आहे. पादचारी दिन साजरा करणारं पुणे हे देशातील पहिलं शहर ठरणार आहे. सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हा देखील एक महत्वाचा घटक असतो. मोठ्या शहरांमध्ये रस्त्यालगत पादचारी मार्ग बनवलेले असतात. त्या पार्श्वभूमीवर पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, त्याचं महत्व समजावं, या उद्देशानं पुणे महापालिका 11 डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करणार आहे. तशी घोषणा आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलीय. (Pedestrian Day will be celebrated in Pune, Information of Mayor Muralidhar Mohol)

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा? दरवर्षी हा दिन साजरा करण्यासाठी काय करता येईल? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. तशी माहिती मोहोळ यांनी दिली आहे. यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं सुजित पटवर्धन, हर्षद अभ्यंकर, प्रांजली देशपांडे, सूरज जयपूरकर, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्यासह पथ, मेट्रो, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित घटकांकडून पादचारी दिन कसा साजरा करण्यात यावा, याबद्दल मते जाणून घेतल्याचं मोहोळ म्हणाले.

त्याचबरोबर शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही यावेळी चर्चा झाली. केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम करण्याचा आपला मानस असल्याचं महापौरांनी सांगितलं.

लोहगाव विमानतळ 14 दिवस बंद राहणार

लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 14 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद राहणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना आता मुंबई विमानतळावर अवलंबून राहावं लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलं आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरु झाला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसाच उड्डाणं होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 16 दिवस तिही बंद होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.

इतर बातम्या : 

काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज – नाना पटोले

Dhule ZP by Election : भाजपला बहुमतासाठी 2 जागांची गरज, महाविकास आघाडीचं तगडं आव्हान

Pedestrian Day will be celebrated in Pune, Information of Mayor Muralidhar Mohol