पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातवा वेतन आयोग लागू

महापालिकेतील जवळपास 17 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिलीय. पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नगरविकास विभागानं तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातवा वेतन आयोग लागू
पुणे महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 6:28 PM

पुणे : पुणे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महापालिकेतील जवळपास 17 हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी माहिती दिलीय. पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी नगरविकास विभागानं तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. (Seventh Pay Commission imposed on Pune Municipal Corporation officers and employees)

‘पुणे महापालिकेच्या जवळपास १७ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला ही अतिशय महत्त्वाची आणि समाधानाची बाब असून यासाठी आपण महापालिकेच्या मुख्यसभेकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि त्यादृष्टीने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. महापालिका स्तरावर विविध टप्प्यांवर आम्ही याचा पाठपुरावा करुन विषय अंतिम मान्यतेसाठी नगरविकास खात्याकडे पाठवला होता. या संदर्भात माझ्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारशी पत्रकारव्यवहार करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. त्याला अंतिम मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक धन्यवाद’, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी आभार व्यक्त केले आहेत.

सातव्या वेतन आयोगासाठी राष्ट्रवादी आक्रमक

पुणे महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली होती. 10 मार्च 2021 ला पुणे महापालिकेने यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. पुणे महापालिकेतील कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून अजूनही वंचित होते. या मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. पुण्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याच मागणीला घेऊन पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ द्यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.

महापानगरपालिका आता कर्मचाऱ्यांची ‘नशा’ उतरवणार!

व्यसनाच्या जोखडात अडकून पडलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी आता पुणे महानगरपालिकेनं पुढाकार घेतला आहे. व्यसनाचा विळखा सोडवण्यासाठी धडपडत असलेले आपले कर्मचारी आणि सेवकांना व्यसनमुक्ती केंद्रात येणारा खर्च महापालिकेकडून उचलला जाणार आहे. महापालिकेच्या आरोग्य योजनेद्वारे हा खर्च केला जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

विशेष बाब म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांसाठी पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगारी रजाही दिली जाणार आहे. त्याचबरोबर व्यसनमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला जाणार असल्याची माहितीही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली आहे.

इतर बातम्या :

भाजप नगरसेवकावर विनयभंगाचा आरोप, चूक केली असेल तर चौकशी झाली पाहिजे- सोमय्या

Nitin Gadkari : पत्नीला न सांगता जेव्हा सासऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवला! नितीन गडकरींचा मोठा गौप्यस्फोट

Seventh Pay Commission imposed on Pune Municipal Corporation officers and employees

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.