मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या रोखठोक वक्यव्यामुळे आणि कामाच्या धडाडीमुळे ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपमध्येच नाही तर सर्वच राजकीय पक्षात गडकरींना मानणारा मोठा वर्ग आहे. अशा नितीन गडकरी यांनी गुरुवारी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणाऱ्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेच्या कामाची पाहणी केलीय. हरियाणाच्या सोहनामध्ये एक कार्यक्रमही पार पडला. यावेळी नितीन गडकरी यांनी आपल्या कुटुंबाबाबतचा एक मोठा गौप्यस्फोट करत आपल्या कार्यशैलीचं दर्शन घडवलं आहे. (Nitin Gadkari demolished his father-in-law’s house for road works)