AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती झालीय, तो नेमका काय आहे? सर्वात श्रीमंत ट्रस्टचा कारभार कसा चालतो?

तिरुपती देवस्थान ट्रस्टवर नियुक्ती होणं, इतकं मानाचं का समजलं जातं? आणि तिरुपती ट्रस्टचा कारभार कसा चालतो?

ज्या तिरुपती देवस्थानच्या ट्रस्टपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती झालीय, तो नेमका काय आहे? सर्वात श्रीमंत ट्रस्टचा कारभार कसा चालतो?
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 12:41 PM
Share

तिरुपती: देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या (Tirumala Tirupati Devasthan Trust) सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh) जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळेच प्रश्न तयार होतो, तिरुपती देवस्थान ट्रस्टवर नियुक्ती होणं, इतकं मानाचं का समजलं जातं? आणि तिरुपती ट्रस्टचा कारभार कसा चालतो? याच सगळ्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ( How is the Tirumala Tirupati Devasthan Trust run? Appointment of Milind Narvekar as a member of Tirupati Trust )

जगातील सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्ट

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट हे जगातील दुसरं सर्वात श्रीमंत धार्मिक ट्रस्ट आहे. तिरुपती व्यंकेटेश्वर मंदिराचं व्यवस्थापन पाहण्याचं काम या ट्रस्टकडे आहे. तिरुपतीमध्येच टीटीडी म्हणजेच तिरुमला तिरुपती देवस्थानचं कार्यालय आहे. जिथं तब्बल 16 हजार कर्मचारी काम करतात.

तिरुपती देवस्थान ट्रस्टचा इतिहास काय?

टीटीडीची स्थापना 1932 मध्ये झाली होती. यासाठी टीटीडी अधिनियम बनवण्यात आला. मंदिराच्या संचालनासाठी 7 सदस्यांची एका कमिटी स्थापन करण्यात आली. या कमिटीच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मद्रास सरकारद्वारे आयएएस दर्जाच्या एका आयुक्ताची नेमणूक करण्यात आली. समितीला सल्ला देण्यासाठी 2 सल्लागारांची नियुक्ती झाली. याशिवाय पुजाऱ्यांचीही नियुक्ती यामध्ये करण्यात आली.

1969 नंतर मंदिर ट्रस्ट सदस्यांची संख्या वाढवली

आंध्र प्रदेश चॅरेटेबल ट्रस्ट आणि हिंदू धार्मिक संस्थान आणि एव्हॉमेंट अॅक्ट हा 1969 साली पास झाला. त्यानंतर ट्रस्ट्रीची संख्या 5 वरुन 11 करण्यात आली. तर 1979 साली ही सदस्य संख्या 11 वरुन 15 करण्यात आली. वंशावळीनुसार पुजारी बनण्याची पद्धत संपवण्यात आली. गैरहिंदूंना तिरुपतीला भेट द्यायची असल्यास, त्यांना व्यंकटेश्वरावर विश्वास आहे असं लिहलेल्या फॉर्मवर सही करण्याचा कायदा आला.

टीटीडी ट्रस्ट अंतर्गत किती विभाग येतात?

तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्ट अंतर्गत अनेक विभाग काम करतात. जसं की लाडू बनवण्याचा विभाग, रस्ते आणि पूल बनवण्यासाठी इंजिनिअरिंग विभाग, पाण्याच्या नियोजनासाठी जलसंपदा विभाग, भक्तांना मंदिरापर्यंत आणणे आणि पुन्हा तिरुपतीत सोडण्यासाठी बसेसची गरज लागते. तिरुपती ट्रस्ट या बस मोफत पुरवतं, यासाठीचा पहिवहन विभाग, अर्थ आणि लेखापाल विभाग, जनसंपर्क विभाग, वन आणि उद्यान विभाग, मंदिर अनेक शाळा महाविद्यालयं चालवतं, रुग्णालयाची सेवा देतं यासाठीचा शिक्षण आणि आरोग्य विभाग. थोडक्यात सांगायचं झालं तर एक राज्य चालवायला जितका खटाटोप आहे, तितकाच खटाटोप हा तिरुपती संस्थान चालवायला करावा लागतो. संस्थानाचा पसारा एवढा मोठा आहे की त्याला सांभाळणं अवघ्या काही लोकांचं काम नाही. म्हणून देशभरातून या संस्थानावर सदस्य भरले जातात.

मिलिंद नार्वेकरांची तिरुपती ट्रस्टवर नियुक्ती कशी झाली?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी ( Y S Jaganmohan Reddy) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे काल अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

 

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन, तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती

दापोलीच्या समुद्र किनारी परवानगी न घेता मिलिंद नार्वेकरांचा बंगला, किरीट सोमय्यांचा आरोप

तेजस उद्धव ठाकरेंची राजकीय इनिंग सुरु? आता मिलिंद नार्वेकर म्हणतात, एक घाव, दोन तुकडे!

BCCI चे MCA च्या पावलावर पाऊल, मिलिंद नार्वेकरांकडून IPL स्थगितीचे स्वागत

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.