BCCI चे MCA च्या पावलावर पाऊल, मिलिंद नार्वेकरांकडून IPL स्थगितीचे स्वागत

IPL ची स्पर्धा आता स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. सद्याच्या वेळापत्रकानुसार खेळण्यात येणारे सामने रद्द करण्यात आले आहेत (Milind Narvekar Rajiv Shukla IPL)

BCCI चे MCA च्या पावलावर पाऊल, मिलिंद नार्वेकरांकडून IPL स्थगितीचे स्वागत
Milind Narvekar Rajiv Shukla
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 3:13 PM

मुंबई : देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठले. त्यामुळे सध्या सुरु असलेली आयपीएल 2021 ची (IPL 2021) स्पर्धा स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई प्रीमियर लीगचे चेअरमन मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्या निर्णयाचे स्वागत केले. (MCA Chairman Milind Narvekar welcomes BCCI Rajiv Shukla Jay Shah decision to suspend IPL 2021)

काय म्हणाले मिलिंद नार्वेकर?

“IPL स्थगित करण्याच्या निर्णयाचं स्वागत करतो. विषाणूविरुद्धच्या लढ्यात करण्याची उत्तम गोष्ट म्हणजे घरी राहून स्वतः सुरक्षित राहणे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवणे. यंत्रणेवर आधीच असलेला ताण कमी करण्याचाही हा उत्तम मार्ग आहे, मग ती कुठल्याही राज्याची का असेना” असे ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केले आहे.

IPL 2021 स्थगित

देशभर कोरोनाचा उद्रेक होत असूनही आयपीएलच्या स्पर्धा सुरुच होत्या. खेळाडूंसाठी बायो बबलचे नियम होते. मात्र तरीही खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे कालचा RCB विरुद्ध KKR हा सामना रद्द झाला होता.त्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे IPL ची स्पर्धा आता स्थगित करण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. सद्याच्या वेळापत्रकानुसार खेळण्यात येणारे सामने रद्द करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली. आयपीएलमधील उर्वरित सामने कधी घेण्यात येतील याबाबत आयपीएलकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.

आयपीएलमध्ये कोरोनाचा उद्रेक

दरम्यान काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जण आणि एक स्टेडियम कोरोनाच्या विळख्यात सापडलं होतं. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या (Chennai Super Kings) ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. सीएसकेच्या संघातील इतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. काल एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित 10 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आयोजकांच्या चिंता वाढल्या आहेत. याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे.

मुंबई प्रीमिअर लीग T20 तिसरा सिझनही पुढे

सध्या कोव्हिड प्रादुर्भावामुळे यंत्रणांवर असलेला ताण लक्षात घेत मुंबई प्रीमिअर लीग T20 मालिकेचा तिसरा सिझन तूर्त आयोजित करण्यात येणार नाही. प्रत्येकाची सुरक्षितता लक्षात घेत पुढील आदेशापर्यंत मालिका भरवणार नसल्याचं पत्रक गेल्या गुरुवारी जारी करण्यात आलं होतं. मुंबई प्रीमियर लीगचे चेअरमन या नात्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह संयुक्तपणे निर्णय घेत असल्याचं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं. (MCA Chairman Milind Narvekar welcomes BCCI Rajiv Shukla Jay Shah decision to suspend IPL 2021)

राजकारणाचा फटका?

मुंबई प्रीमिअर लीग टी20 स्पर्धेला (MPL T20 Mumbai Premier League) कोरोनाचा फटका बसला, की क्रिकेटमधल्या शह काटशह राजकारणाचा, असा सवाल विचारला जात आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) चे अध्यक्ष विजय पाटील (Vijay Patil) आणि मुंबई प्रीमियर लीगचे चेअरमन मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा केली. पण त्याच्या आदल्याच दिवशी ‘बीसीसीआय’ने (BCCI) एमसीएला कोव्हिड संबंधी नियमांचे पालन करत स्पर्धा आयोजित करण्याची परवानगी दिली होती.

‘एमसीए’ सचिवाचे बीसीसीआयला पत्र

‘बीसीसीआय’ने एमसीएला पाठवलेला परवानगीचा ईमेल ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला आहे. एमसीएतील एका पदाधिकाऱ्याने ‘बीसीसीआय’ला पत्र ई मेल करुन मुंबई प्रीमियर लीग T-20 स्पर्धेच्या आयोजनासाठी परवानगी मागितली होती. ‘बीसीसीआय’च्या अपेक्स कौन्सिलच्या बैठकीत या विषयावर चर्चा-विचार विनिमय झाला.

IPL नंतर 15 दिवसांत MPL भरवण्याची परवानगी

त्या अनुषंगाने आयपीएल IPL स्पर्धा झाल्यानंतर 15 दिवसांत स्पर्धा आयोजन करण्याची परवानगी बीसीसीआयने एमसीएला दिली. तसंच कोव्हिड नियमांचे पालन करुन ही स्पर्धा आयोजित करण्यात यावी, असेही सांगण्यात आले. पण या परवानगी नाट्यावर शह काटशहचे राजकारण रंगले आहे.

MCA विरुद्ध BCCI

MCA अध्यक्ष आणि MPL चेअरमन यांना विश्वासात न घेता BCCI कडे सेक्रेटरींनी परवानगी मागितल्याने, परवानगी मिळाल्याच्या 24 तासात स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई प्रीमिअर लीगच्या T20 स्पर्धा आयोजनावरुन MCA तील अध्यक्ष आणि MPL चे चेअरमन विरुद्ध सेक्रेटरी, तसंच MCA विरुद्ध BCCI असे राजकारण चव्हाट्यावर आले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई प्रीमिअर लीग T20 पुढे ढकलली, मिलिंद नार्वेकरांच्या पहिल्याच स्पर्धा आयोजनाला कोरोनाचा फटका

MPL T20 | मुंबई प्रीमिअर लीग पुढे ढकलण्यास कोरोनाचे कारण, दडलंय वेगळंच राजकारण?

IPL Suspend : कोरोनाचा उद्रेक, BCCI ची मोठी घोषणा, आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित

(MCA Chairman Milind Narvekar welcomes BCCI Rajiv Shukla Jay Shah decision to suspend IPL 2021)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.