पेन्शन बायकोला… आनंद नव-याला… आंदोलनस्थळी नवऱ्यानं केलं हटके सेलिब्रेशन
राज्यातील लाखो कर्मचारी हे जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी आक्रमक झालेले होते. त्याच दरम्यान आंदोलकांना लेखी आश्वासन मिळाल्यानंतर एका नवऱ्याने हटके जल्लोष साजरा केला आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक राज्य शासनाचे कर्मचारी संपावर होते. विविध विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन लागू करावी म्हणून काम बंद आंदोलन करीत होते. जुनी पेन्शन लागू होईल की नाही यासाठी आक्रमक भूमिका घेतलेले कर्मचारी पुढील काळात काय निर्णय घेतात अशी स्थिती असतांना राज्य शासनाबरोबर झालेल्या बैठकीत जुनी पेन्शन लागू होण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत पेन्शनची मागणी करणाऱ्या आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याचे जाहीर होताच पुण्यातील खेड येथे हटके सेलिब्रेशन पाहायला मिळाले आहे.
बायकोला पेन्शन मिळणार असल्याने नवऱ्याने हटके सेलिब्रेशन केले आहे. यामध्ये निर्णय समजताच आंदोलन स्थळीची बायकोला उचलून घेत मोठा जल्लोष केला आहे. गेल्या सात दिवसांपासून आंदोलन सुरू असलेले आंदोलन यशस्वी झाल्याने नवऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
बायकोला पेन्शन मिळणार म्हणुन चक्क नव-याने बायकोला आंदोलनस्थळी उचलुन घेत आनंद साजरा केल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. राज्य सरकारच्या विरोधात जुनी पेन्शन मिळावी यासाठी कर्मचारी काम बंद आंदोलन करीत होते. आज त्यांना आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेत असल्याचे संप कऱ्यांच्या संघटनेने जाहीर केले आहे आहे.
यावेळी बायकोला जुनी पेन्शन मिळणार या आनंदात चक्क बायकोलाच उचलुन घेत नवऱ्याने खेड येथे जल्लोष केला आहे. आंदोलनस्थळी नवराही उपस्थित असल्याने लागलीच जल्लोष करण्यात आला त्यावेळी हे हटके सेलिब्रेशन पाहायला मिळाले आहे. त्याची चर्चा आता सोशल मिडियावर होऊ लागली आहे.
गेल्या सात दिवसांपासून राज्यातील कर्मचारी हे विविध पद्धतीने सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन करीत होते. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी देत सरकारी कर्मचाऱ्यानी जोरदार घोषणाबाजी केली होती. यामध्ये पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा देण्यात आल्या होत्या.
तर काही ठिकाणी काळ्या फिती लावून पायी मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन करत जुनी पेन्शन योजना सरकार लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच आहे अशी भूमिका आंदोलन कर्मचाऱ्यांनी घेतली होती. यामध्ये 28 तारखेपासून वर्ग एकचे अधिकारी देखील या आंदोलनात सहभागी होणार होते.
राज्यातील महसूल, आरोग्य, शिक्षण विभागातील लाखो कर्मचारी संपावर होते. काही ठिकाणी आरोग्य सेवा देखील कोलमडली होती. त्यामध्ये रुग्णांची हाल होत होती तर दुसरीकडे शिक्षकांनी शाळेत शिकवणं बंद केल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते. त्यामुळे संप अधिकच तीव्र होतांना दिसून येत होता.