AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मांडीवर अल्पवयीन मुली, कानात मंत्रोच्चार करत भोंदूबाबा म्हणायचा…, स्वप्नील लांडेवर लैंगिक शोषणाचे आरोप, नक्की प्रकरण काय?

पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोंदूबाबा अल्पवयीन मुलींना मांडीवर बसवायचा आणि त्यांच्या कानात मंत्रोच्चार करत काय विचारायचा... याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. तर जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे.

मांडीवर अल्पवयीन मुली, कानात मंत्रोच्चार करत भोंदूबाबा म्हणायचा..., स्वप्नील लांडेवर लैंगिक शोषणाचे आरोप, नक्की प्रकरण काय?
Swapnil Lande
| Updated on: Aug 14, 2026 | 12:42 PM
Share

भोंदूबाबा अशोक खरात याचं काळ कृत्य समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडालेली. महिलांची फसवणूक केल्याचे अनेक आरोप अशोक खरात याच्यावर आहेत. एवढंच नाही तर, त्याचे अनेक अश्लील व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता पुन्हा पुण्यातून संतापजनक प्रकार समोर आला आहे. श्रद्धेच्या नावाखाली अनेकांची फसवणूक करणाऱ्या स्वप्नील लांडे (Swapnil Lande) याचं पितळ उघड झालं आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्याचा दावा करत, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत लहान मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप स्वप्नील लांडे याच्यावर आहेत.

समोर आलेल्याल धक्कादायक माहितीनुसार, भोंदूबाबा स्वप्नील लांडे याने मुलीला मांडीवर बसवलं आणि तिच्या कानात मंत्र फुकला. त्यानंतर मुलीला सांगितलं, ‘तुला काहीही अडचण अली तर माझ्याकडे ये…’, या घटनेनंतर पीडित मुलीतं कौन्सिलिंग करण्यात आलं आहे. या कृत्यानंतर स्वप्नील लांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तो पुण्यातील बिबवेवाडी येथे राहतो. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पण कथित आरोपी फरार आहे.

पोलीस याप्रकरणी सध्या कसून चौकशी करत आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली स्वप्नील याने आधी कुटुंबियांचा विश्वास जिंकला. त्यानंतर त्यांच्या विश्वासाचा गैरवापर करत मुलींवर अत्याचार केले.. धक्कादायक सत्य म्हणजे, पुण्यात पुन्हा भोंदूबाबा प्रकरण समोर आल्यामुळे मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार, पोलीस भोंदूबाबाता शोध घेत आहेत तर, श्रद्धेच्या नावाखाली आणखी किती मुलींची फसवणूक केली आहे. याप्रकरणी देखील प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनंतर पालकांनीही अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उभा राहत आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरु असलेल्या भयानक प्रकरणांमुळे मुलींच्या सुरक्षाला धोका पोहोचत आहे. त्यामुळे अशी भोंदूबाबांवर विश्वास ठेऊ नका.. असं आवाहन मुलींच्या आई – वडिलांना करण्यात येत आहे. सांगायचं झालं तर, याआधी देखील पोलिसांनी अनेक भोंदूबाबांना अटक केली आहे. आता याप्रकरणी काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्