AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 दिवसांपूर्वीच माझा सासरा …; पुण्यात 9 वर्षाच्या नातीसोबत आजोबाचे धक्कादायक कृत्य, पीडितेच्या आईचा खळबळजनक खुलासा

पुण्यातील पर्वती परिसरात एका ७० वर्षीय आजोबाने नऊ वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात ठिय्या आंदोलन केले असून, पोलिसांनी आरोपी अंबादास जाधव याला अटक केली आहे.

15 दिवसांपूर्वीच माझा सासरा ...; पुण्यात 9 वर्षाच्या नातीसोबत आजोबाचे धक्कादायक कृत्य, पीडितेच्या आईचा खळबळजनक खुलासा
women assault
| Updated on: May 06, 2026 | 9:57 AM
Share

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चिमुकलीवर अत्याचार करुन तिला ठार मारल्याची घटना 1 मे रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पर्वती परिसरात माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या ९ वर्षांच्या नातीवर तिच्याच सख्ख्या आजोबांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अंबादास यल्लाप्पा जाधव (७०) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील मजुरी कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांची मुलगी घरात एकटीच होती. तिची जबाबदारी ७० वर्षीय आजोबांवर होती. रात्री साडेनऊच्या सुमारास आजोबांनी नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका महिलेला संशय आला. तिने प्रसंगावधान राखत घराच्या फटीतून डोकावून पाहिले. त्यानंतर हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांनी तात्काळ जमा होऊन घराचे दार उघडण्यास सांगितले, मात्र आरोपीने आतून दार बंद करून घेतले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून नराधम आजोबाने मुलीला घराच्या पोटमाळ्यावर लपवले. त्यानंतर दार उघडले.

रात्री उशिरापर्यंत ठिय्या आंदोलन

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. पर्वती पायथा परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत परिसरात ठिय्या आंदोलन केले. ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नीच माणसाला सोडू नका

या घटनेनंतर पीडितेच्या आईने संतप्त प्रतिक्रिया दिली. “तो माझा सासरा असला तरी त्याने केलेले कृत्य माफीच्या पलीकडे आहे. अशा नीच माणसाला सोडू नका, त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे.” अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. तो १५ दिवसांपूर्वीच आमच्या घरी राहण्यासाठी आला होता. रस्ते बंद असल्याने मला आताच ही घटना समजली, अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.

दरम्यान पुणे पोलिसांनी आरोपी अंबादास जाधव याच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे शहरात लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; वाहतुक कोंडी
राजू शेट्टींसह शेतकरी आक्रमक, पुणे-बंगळूर महामार्ग रोखला; मोठी वाहतुक कोंडी
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून डिस्चार्ज आता प्रकृती स्थिर, डॉक्टरांनी...
शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणा
Shivsena Hearing : शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; कोणत्या मुद्द्यावर होणार युक्तीवाद?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालाचाली? कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक, नेमकं कारण...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बडा नेता शिंदे गटात...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! हिंगोलीतील बड्या नेत्याचा समर्थकांसह शिंदे गटात प्रवेशाचा निर्णय
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक
Donald Trump: अमेरिकेतही आकडे फिरले? मध्यवर्ती निवडणूकांच्या प्राथमिक कलांमध्ये ट्रम्प यांना मोठा धक्का