AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात अपघाताचा थरार; कारच्या धडकेत आयटी इंजिनीअर ठार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल

पुण्यात पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली. पाषाण रोडवरील अपघातात एका इंजिनीअरचा मृत्यू झाला. या प्रकरणी 19 वर्षीय चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात अपघाताचा थरार; कारच्या धडकेत आयटी इंजिनीअर ठार, 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल
pune accident Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 13, 2026 | 11:22 AM
Share

पुण्यातील अपघाताच्या मालिका सुरू आहे. पुण्यातील नवले पूल असो कल्याणीनगर… भीषण अपघात सुरूच आहे. आयटी हब म्हणून नावारुपाला आलेल्या शहरात पुन्हा एक भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात एका आयटी इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे. भरधाव कारच्या धडकेत वीरेंद्र द्विवेदी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पुण्यातील पाषाड रोडवर झालेल्या अपघातात वीरेंद्र द्विेवेदी यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय कार चालक ईशान विशाल शेठिया याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाषाण रोडवर भरधाव धडकेच 48 वर्षीय वीरेंद्र हे ठार झाले. अपघाताची ही घटना शनिवारी सकाळी सात वाजता पाषाण येथील हनुमान मंदिराजवळच्या नेकलेस गार्डनजवळ घडली. या अपघात प्रकरणी 19 वर्षीय काल चालक ईशानवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वीरेंद्रचा भाऊ धीरेंद्र द्विवेदी याने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

वीरेंद्र हे हिंजवडीत विप्रो कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून कामाला होते. ते शनिवारी सकाळी एनडीएकडून पाषाणकडे मॉर्निंग वॉकला निघाले. त्याचेवेळी ईशान विशाल शेठिया याची कार पाठिमागून त्यांना धडकली. कारच्या भरधाव धडकेत वीरेंद्र रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर जागीच कोसळले. इशान आणि विरेंद्र यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु औध रुग्णालयात दाखल केलेल्या वीरेंद्र यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इशानचे वडील एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करतात. तर इशान हा पुणे-मुंबई महामार्गावरील ऑक्सफोर्ड महाविद्यालयात शिक्षण घेतो. तो घटनेच्या दिवशी महाविद्यालयातून घरी चालला होता.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा