Pune Municipal Corporation Result : ..या भीतीने प्रमुख नगरसेवकांना पाडण्यात आले – वसंत मोरे यांचा गंभीर आरोप

पुणे मनपा निवडणुकीतील धक्कादायक निकालानंतर वसंत मोरेंनी गंभीर आरोप केले आहेत. पराभवानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर "षडयंत्रा"चा ठपका ठेवत अनेक प्रमुख नगरसेवकांना जाणूनबुजून हरविल्याचा दावा केला. राज्य सरकारच्या पुणे मनपामधील कारभाराची पोलखोल होऊ नये, यासाठी हे केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Pune Municipal Corporation Result : ..या भीतीने प्रमुख नगरसेवकांना पाडण्यात आले - वसंत मोरे यांचा गंभीर आरोप
वसंत मोरे यांचा आरोप
Image Credit source: social media
| Updated on: Jan 23, 2026 | 8:59 AM

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका गेल्या आठवड्यात पार पडल्या. मतमोजणी होऊन निकालही लागले, मात्र अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल पहायला मिळाले. 165 सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत भाजपने तब्बल 119 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली. मात्र पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत अनेक पक्षांना फटका बसला, ठाकरे गटाचेही मोठं नुकनान झालं. पराभूत झालेल्या अनेक दिग्गजांमध्ये वसंत मोरे यांचाही समावेश होता. मनसेमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले वसंत मोरे हे पुण्याच्या प्रभाग क्रमांक 38 मधून निवडणुकीच्या मैदानात होते. मात्र भाजपच्या संदीप बेलदरे यांनी वसंत मोरे यांचा 1000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. वसंत मोरेंसह त्यांचा मुलगा देखील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवत होते. दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. फायरब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या वसंत मोरेंना अशाप्रकारे पराभव पत्करावा लागल्यामुळे शहरात खळबळ माजली, एकच चर्चा सुरू झाली.

आता या निकालानंतर जवळपास आठवड्याभराने वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली असून त्यामधून त्यांनी अनेक आरोप केले आहेत. पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले, अशी वसंत मोरे यांची तक्रार असून सत्ताधाऱ्यांनी षडयंत्र केल्याचा आरोपही त्यांनी लावला आहे. “राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल…या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले” असा गंभीर आरोप वसंत मोरे यांनी केला असून त्यांनी एक लांबलचक पोस्ट लिहीत पराभत उमेदवारांची लिस्टच लिहीली आहे. तसेच हे सर्वजण जर सभागृहात असते तर राज्य सरकारत्या चार वर्षांच्या पापाचा पाढा सतत बाहेर काढला असता, असंही मोरे यांनी पोस्टमध्ये नमूद करत टीकास्त्र सोडलं आहे.

काय आहे वसंत मोरे यांची सोशल मिडिया पोस्ट?

वसंत मोरे यांची पोस्ट जशीच्या तशी..

पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले ?

याला कारण 2022 ते 2026 या कालावधीमधे राज्य सरकारने प्रशासनाला हाताशी धरून पुणे महानगरपालिकेत केलेला कारभार वेळोवेळी बाहेर काढला जाईल…या भीतीने पुणे महानगरपालिकेत प्रमुख पदांवर काम करणाऱ्या सर्व पक्षीय नगरसेवकांना निवडणुकीत पाडण्यात आले…,

हे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केलं…

आबा बागुल माजी विरोधी पक्षनेता,
दत्तात्रय धनकवडे माजी महापौर,
सुभाष जगताप माजी सभागृहनेता,
विशाल तांबे माजी स्थायी समिती चेअरमन,
अश्विनी कदम माजी स्थायी समिती चेअरमन,
वसंत मोरे माजी विरोधी पक्षनेता गटनेता,
संजय भोसले माजी गटनेता,
दिपाली धुमाळ माजी विरोधी पक्षनेता,
साईनाथ बाबर माजी गटनेता,
अशोक हरणावळ माजी गटनेता,
शंकर केमसे माजी सभागृहनेता,
किशोर शिंदे माजी गटनेता,
बाबू वागसकर माजी गटनेता,
अविनाश बागवे स्थायी समिती सभासद,
नंदाताई लोणकर स्थायी समिती सभासद,
योगेश ससाने स्थायी समिती सभासद,
नाना भानगिरे स्थायी समिती सभासद,
रूपाली पाटील शहर सुधारणा अध्यक्ष

हे सर्वजण जर सभागृहात असते तर यांच्या चार वर्षाच्या पापाचा पाढा सतत बाहेर काढला असता…

असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. त्यांच्या या जाहीर पोस्टमुळे मोठी खळबळ माजली आहे.