AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा, पोलीस उपायुक्तांनी नेमकं काय सांगितलं?

pune news : पुणे बिल्डर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागला महत्वाचा पुरावा, पोलीस उपायुक्तांनी नेमकं काय सांगितलं?
| Updated on: Jul 17, 2026 | 1:00 PM
Share

पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणारे बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खलील शेख यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहिली. तसेच एक व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यात बिल्डर शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रकरणी महत्त्वाची अपडेट दिली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना अटक देखील होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांकडून 14 जणांच्या विरोधात गुन्हा

बिल्डर शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार आणि नगरसेवकासह 14 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर आत्महत्येआधी लिहिलेली चिठ्ठी, व्हिडिओ आणि संबंधित आर्थिक कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहे. आता या प्रकरणी आरोपींची चौकशी देखील केली जाणार आहे. या प्रकरणावर पुण्याचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, ‘ पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणात 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. पोलीस सगळ्याच बाजूने तपास करत आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल’.

बिल्डरचं किती रुपयांचं बील थकलं होतं?

बिल्डरचं किती रुपयांचं बिल थकलं होतं, यावर बोलताना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते म्हणाले, ‘आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आणि व्हिडिओमध्ये त्यांनी अडीच कोटी रुपये थकीत असल्याचे म्हटलं आहे. पुढील तपासात सर्व गोष्टी समोर येतील. त्यांचा व्यवहार कसा होता, त्या अनुषंगाने काय फसवणूक केलेली आहे, हे समोर येईल.

बिल्डर शेख यांच्या प्रकल्पात किती पार्टनर होते, यावर पोलीस उपायुक्त मोहिते म्हणाले, ‘या प्रकरणी रात्रीच गुन्हा दाखल झालेला आहे. तपासानंतर या गोष्टी समोर येतील’. तर अटकेच्या कारवाईवर म्हणाले, ‘ हा गंभीर गुन्हा आहे. यात जवळपास दहा वर्षांची शिक्षा आहे. त्यामुळे योग्य दृष्टीने तपास होईल. अटकेची कारवाई देखील करावी लागेल’.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...