
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी रात्री उशीरा छापेमारी केली. धक्कादायक बाब म्हणजे पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही पार्टी सुरू होती. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा या पार्टीत समावेश असून तीन महिलांसह दोन पुरूषांचा ताब्यात घेण्यात आलंय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यादरम्यान आता आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले असून एकनाथ खडसे हे गिरीष महाजन यांच्यावर टीका करत असताना ही छापेमारी झाल्याने शंका व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील उच्चभ्रू म्हणून खराडीची ओळख आहे आणि तिथेच एका घरात ही रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली असता काही महिलांसह पुरूषांना ताब्यात घेण्यात आले. आता भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने आरोप करत म्हटले की, एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांनीच या पार्टीचे आयोजन केले होते. या रेव्ह पार्टीमध्ये अंमली पदार्थ, दारू आणि हुक्क्याचे सेवन केले जात असल्याचे होते.
पोलिसांना पार्टीच्या ठिकाणी काही अंमली पदार्थ सापडल्याची देखील चर्चा आहे. पोलिसांचा छापा पडल्यानंतर काही महिलांनी पळ काढला. सध्या पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टीतील लोकांना ताब्यात घेतले असून चाैकशी सुरू आहे. रेव्ह पार्टी करताना जावई रंगेहात पकडल्यानंतर एकनाथ खडसे काय बोलतात? याकडे सर्वांच्या नजरा आहेत. पुण्यातील या रेव्ह पार्टीचे आयोजन नेमके कोणी केले, याबद्दल अजून पोलिसांनी काही महिती दिली नाहीये.
खडसेंचे जावई वगळता इतर पार्टीमध्ये सहभागी असलेल्यांची नावे ही अजून पुढे येऊ शकली नाहीत. मात्र, एकनाथ खडसे यांच्या जावायला पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणात ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली असून राजकीय भूंकप आलाय. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे मंत्री गिरीष महाजन यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. त्यामध्येच आता त्यांच्या जावायला ताब्यात घेतले आहे. यावरून संजय राऊत यांनी थेट गिरीष महाजन यांच्यावर आरोप केले आहेत.