प्रांजल खेवलकर प्रकरणानंतर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, खराडीतील या गोष्टी रडारवर, टेन्शन कुणाला?

एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पार्टी करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले. यानंतर आरोप सुरू आहेत. एकनाथ खडसे यांनी थेट पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप केली आहेत. आता हे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे.

प्रांजल खेवलकर प्रकरणानंतर पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, खराडीतील या गोष्टी रडारवर, टेन्शन कुणाला?
Pune police
| Updated on: Jul 31, 2025 | 8:46 AM

पुणे : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी करताना रंगेहात ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी अनेक खुलासे होताना दिसत आहेत. जावयासाठी स्वत: एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे मैदानात आहेत. प्रांजल यांना कोर्टात हजर करण्यात आले, त्यावेळी रोहिणी खडसे आणि त्यांच्यामध्ये संवाद झाला. माझ्या जावयाला फसवले जात असल्याचे खडसेंनी म्हटले असून यामागे मोठा प्लॅन आहे. फक्त हेच नाही तर पोलिसांना जावयाच्या मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल करण्याचा कोणी अधिकार दिल्याचेही खडसेंनी म्हटले.

खराडी भागातील पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर

खराडी भागात रेव्ह पार्ट्या होत असल्याने पोलिसांची आता करडी नजर आहे. खराडीतील खाजगी पार्ट्या रडारवर आल्या आहेत. हॉटेल आणि सर्विस अपार्टमेंट व्यावसायिकांना पोलिसांनी सूचना दिल्या आहेत. खराडीत हाय प्रोफाईल खाजगी पार्टीवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडीचा परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

अमली पदार्थ विक्री रोखण्याचे मोठे आव्हान

या भागातील सर्विस अपार्टमेंटमध्ये होणाऱ्या बेकायदा खाजगी पार्ट्या अमली पदार्थ विक्री रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. यावर आता पोलिसांची नजर असणार आहे. ओळख लपवून एकापेक्षा जास्त ग्राहकांनी खोली भाड्याने घेणे, वारंवार येणारी जोडपी, वेश्याव्यवसाय,अमली पदार्थ विक्री आणि पार्टीमध्ये होणाऱ्या अमली पदार्थाची सेवन, परदेशी नागरिकांचे वास्तव्य, रहिवासी इमारतीच्या हॉटेल व्यावसायासाठी होणारा व्यावसायिक वापर यावर नजर असेल.

एकनाथ खडसेंचे पुणे पोलिसांवरच गंभीर आरोप 

खराडी भागातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर त्यांना दारू, अमली पदार्थ आणि गांजा आढळून आला. या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता. या पार्टीत खडसेंचे जावई असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी अगोदरच स्पष्ट केले की, पार्टीच्या ठिकाणी छापेमारी केली होती, त्यावेळी प्रांजल खेवलकर हा एकनाथ खडसेंचा जावई असल्याची आपल्याला काहीही कल्पना नव्हती. ही बाब तपासात पुढे आली आहे.