Pune News : पुणे तिथे काय उणे ! घरखरेदीसाठी पुण्याला पहिली पसंती, 6 महिन्यांत…

पुणे शहर घर खरेदीसाठी देशात प्रथम क्रमांकाचे पसंतीचे ठिकाण बनले आहे. गेल्या सहा महिन्यांत कार्यालयीन जागांच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे पुणे, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक मागणी दिसून येते. 'सीआरई मॅट्रिक्स'च्या अहवालानुसार, नवीन पुरवठ्यात पुणे-हैदराबाद आघाडीवर असून, मागणीत पुणे-बेंगळुरूने लक्षणीय वाटा उचलला आहे.

Pune News : पुणे तिथे काय उणे ! घरखरेदीसाठी पुण्याला पहिली पसंती, 6 महिन्यांत...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Updated on: Oct 08, 2025 | 8:23 AM

पुणे तिथे काय उणे ! हे तर सर्वांनीच ऐकलं असेल. सुशिक्षितांचं शहर, विद्येम माहेरघर अशी ख्याती असलेल्या या शहराला अनेक दिग्गजांचा सहवास ममिळाला. लेखक, साहित्यिक, कवी, अभिनेते, असे अनेक मान्यवर पुण्यात वास्तव्य करत होते, आजही अनेक मोठी माणसं पुण्यात राहतात. ही गोष्ट पुणेकरांसाठी अभिमानास्पद आहे. त्यातच आता पुण्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोचला गेला आहे. ते म्हणजे घर खरेदीसाठी पुण्याला देशात एक नंबरची पसंती मिळतेय. गेल्या सहा महिन्यांत पुणे,बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये कार्यालयीन जागांची मागणी वाढली असली तरी,देशभरातील मागणी आणि पुरवठा या दोन्हीमध्ये पुण्यात सर्वाधिक वाढ झाली आहे.

पुणेकर होण्यास लोकांची पसंती

पुण्यात घर खरेदीसाठी देशात एक नंबरची पसंती, सहा महिन्यात अभिमानास्पद आकडा समोर आला आहे. पुण्यात निवासी घरांच्या मागणीत वाढ होत असतानाच,आता कार्यालयीन जागांच्या मागणीतही शहराने मोठी झेप घेतली आहे. गेल्या सहा महिन्यांत पुणे, बेंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या शहरांमध्ये कार्यालयीन जागांची मागणी वाढली असली तरी,देशभरातील मागणी आणि पुरवठा या दोन्हीमध्ये पुण्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स’च्या अहवालानुसार, चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कार्यालयीन जागांच्या नवीन पुरवठ्यात पुणे आणि हैदराबादचा वाटा 54 टक्के आहे, तर मागणीत पुणे आणि बेंगळुरूने 40 टक्के वाटा उचलला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी पुण्यात कार्यालयीन जागांसाठी करार केले आहेत, ज्यामुळे निवासी घरांप्रमाणेच कार्यालयीन जागांमध्येही पुण्याची घोडदौड कायम आहे.

या अहवालानुसार, चालू वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशभरातील कार्यालयीन जागांच्या नवीन पुरवठ्यामध्ये पुणे आणि हैदराबाद या दोन शहरांचा एकत्रित वाटा तब्बल 54 टक्के आहे. याचा अर्थ, नवीन कार्यालये उघडण्यासाठी किंवा विस्तारण्यासाठी या शहरांना अधिक पसंती दिली जात आहे. मागणीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पुणे आणि बेंगळुरू या शहरांनी आघाडी घेतली आहे. या दोन्ही शहरांमधील कार्यालयीन जागांची मागणी मिळून 40 टक्के आहे. याचा अर्थ, या शहरांमध्ये कंपन्यांना कामासाठी जागांची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. त्यामुळे पुण्यात घर घेण्यास अनेकांची पसंती असून बरेच जण पुणेकर होण्यास उत्सुक दिसत आहेत.