AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे मुख्यमंत्र्यांचं ते विधान, दुसरीकडे नाथाभाऊ ज्येष्ठ वकिलाच्या भेटीला, नेमकं काय घडतंय?

पुण्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीत पकडण्यात आलं आहे, या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे.

एकीकडे मुख्यमंत्र्यांचं ते विधान, दुसरीकडे नाथाभाऊ ज्येष्ठ वकिलाच्या भेटीला, नेमकं काय घडतंय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2025 | 8:31 PM
Share

शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी पुण्यात मोठी कारवाई केली, खराडी भागात एक रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती, पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. धक्कादायक म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. या प्रकरणानं राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?

दुपारी देखील बोललो मला या संदर्भात कुठलेही राजकीय वक्तव्य करायचं नाही, पोर्शे प्रकरणात ज्या लोकांनी अहवालात गडबड केली त्यांना नोकरीतून काढून टाकलं आहे, त्यामुळे कोणीही गडबड केली तर त्यावर कारवाई होईल आणि तेव्हापासून जे काही अहवाल आहेत, ते वेळेत आणि योग्य आले पाहिजे अशा प्रकारचा हा विभागाचा प्रयत्न आहे.  एखादा अहवाल आधी आला, एखादा उशिरा आला यातून त्याचं मूल्यमापन करणे योग्य नाही, मी याला राजकीय रंग देऊ इच्छित नाही आणि त्यांनीही याला विनाकारण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये, त्यातून कुठेतरी त्यांच्याकरता योग्य होणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे आज एकनाथ खडसे यांनी वकील असीम सरोदे यांची भेट घेतली. एनडीपीएस कायदा आणि  प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणाबाबत एकनाथ खडसे यांनी असीम सरोदे यांच्याशी चर्चा केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणात चौकशीदरम्यान अनेक कायदेशीर चुका केल्या असल्याचं यावेळी असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. काही लोकांना आरोपी म्हणून बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरात घुसून व्हिडिओ शूटिंग करणे, व तो व्हिडिओ व्हायरल करणे पोलिसांना भोवणार आहे, इतरांच्या खासगी आयुष्याचा अपमान करणारे हे कोणते पोलिसिंग आहे? राजकीय हेतुप्रेरित पोलिसिंग बंद करण्यासाठी पावले उचलणार आहे, असा इशाराही यावेळी असीम सरोदे यांनी दिला आहे.

दरम्यान  पुणे रेव्ह पार्टीसंदर्भात एकनाथ खडसे यांना कायदेशीर सल्ला दिलेला आहे, एकनाथ खडसे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकरणामागे गिरीश महाजन असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात पोलिसांची कारवाई संशयास्पद आहे, कोणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याचा पोलिसांना कोणताही अधिकार नाही. या प्रकरणात गरज लागली तर मी कायदेशीर बाजू मांडणार आहे, असंही यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!