पुण्याच चाललंय तरी काय? चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर हल्ला, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत…

Pune News : पुण्यात एक अतिशय धक्कादायक अशी घटना घडलीये. चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवरच चार आरोपींना हल्ला चढवला. फक्त हेच नाही तर जमिनीवर पाठून या पोलिसांना बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडालीये.

पुण्याच चाललंय तरी काय? चक्क पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर हल्ला, लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करत...
pune
| Updated on: Aug 02, 2025 | 8:24 AM

पुणे-मुंबई महामार्गावर खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री घडली. चर्च चौक खडकी येथे सुमारे रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण बघायला मिळाले.

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांवर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी जखमी झालेल्या पोलिस शिपायांची नावे असून ते दोघेही मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनचालकाने गाडी अतिशय वेगात आणि वेडीवाकडी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि बेदम झोडपत मारहाण केली.

जमिनीवर पाठून पोलिसांना केली बेदम मारहाण

दरम्यान या प्रकरणी गोपाल देवसिंग कोतवाल यांनी तक्रार दिल्यानंतर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. फक्त गाडी व्यवस्थित चालवण्यास सांगितल्याने या आरोपींना कर्तव्यास असलेल्या पोलिसांना मारहाण केली.

चारही आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात 

खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा या आरोपींवर दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, या घटनेने मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी काही वेळातच आरोपींना ताब्यात घेतले. मागील काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांवर अशाप्रकारची हल्ले वाढल्याचे चित्र बघायला मिळते. पोलिसांवर हात उचलणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे काही दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.