AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News: बकरी ईद निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, ‘हे’ रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग

बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे. त्यामुळे या परिसराती वाहतुकीत पोलीसांनी महत्वाचे बदल केले आहेत.

Pune News: बकरी ईद निमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद, वाचा पर्यायी मार्ग
Pune Traffic Change
| Updated on: Jun 06, 2025 | 3:46 PM
Share

देशभरात ७ जून रोजी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा एक महत्वाचा सण आहे. बकरी ईद निमित्त पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर होणाऱ्या नमाज पाठणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या (७ जून) कोणते रस्ते बंद राहणार आणि पर्यायी मार्ग काय असणार ते जाणून घेऊयात.

भैरोबानाला ते गोळीबार मैदान

शहरातीलभैरोबानाला ते गोळीबार मैदान हा रस्ता सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात स्वारगेटकडे जाणारी जड वाहने प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने-लुल्लानगर चौकाकडे वळविली जाणार आहे. तसेच पुणे स्टेशनकडे वाहने एम्प्रेस गार्डन रस्त्याने मार्गस्थ केली जाणार आहेत.

मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान

मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान हा मार्गही उद्या सकाळी बंद राहणार आहे अशी माहिती वाहतूक पोलीसांनी दिली आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी बिशप स्कूल मार्ग/कमांड हॉस्पिटल मार्ग ते नेपिअर रस्त्याने पुढे सीडीओ चौकातून इच्छित स्थळी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सीडीओ चौक ते गोळीबार चौक

सीडीओ चौक ते गोळीबार चौक हा रस्ताही सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या काळात लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळवली जाणार आहेत, तर खटाव बंगला चौकाकडून येणारी वाहने उजवीकडे नेपिअर रस्त्याकडे वळविली जाणार आहे. तसेच सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान हा रस्ताही बंद राहणार आहे.

जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक

जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक हा रस्ता शनिवारी सकाळी बंद राहणार आहे. या रस्त्याने प्रवास करणारे लोक खाणे मारुती चौक-पुलगेट डेपो-सोलापूर बाजार चौक-नेपिअर रस्ता-खटाव बंगला चौका मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतात. तसेच लुल्लानगर चौकातून गोळीबार चौकाकडे जाताना जड वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. दरम्यान वाहतूक पोलीसांनी उद्या सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.