AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

४०० कोटींचा घोटाळा, ईडीच्या तपासात अडथळा, पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. त्यावेळी त्यांच्या तपासात अमर मूलचंदानी यांच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही.  उलट पुरावा नष्ट केला.  तपासात अडथळे आणले.

४०० कोटींचा घोटाळा, ईडीच्या तपासात अडथळा, पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या
पुणे पोलीस
| Edited By: | Updated on: Jan 29, 2023 | 11:02 AM
Share

रणजित जावध, पिंपरी चिंचवड, पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यात मोठी कारवाई केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई होत आहे. पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली आहे. आता या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात येणार आहे. ईडीच्या तपासात अडथळा आणणाऱ्या तिघांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

शुक्रवारी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. त्यावेळी त्यांच्या तपासात अमर मूलचंदानी यांच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही.  उलट पुरावा नष्ट केला.  तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत शनिवारी रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला अटक केली आहे.

महिलांना होणार अटक

या प्रकरणात मुलचंदानी यांच्या कुटुंबातील दोन महिलांना अटक होण्याची शक्यता आहे. रात्री उशीर झाला म्हणून त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आलं होतं. दरम्यान या प्रकरणात ईडी अधिकाऱ्यांकडून पिंपरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि पुरावा नष्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.

यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

नुकतेच आले होते जामिनावर बाहेर

अटकेत असलेले अमर मूलचंदानी काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले. त्यानंतर आज ईडीने छापा टाकला. बँकेवर आरबीआयने प्रशासक नेमला आहे. या बँकेत हजारो ठेविदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.

कृष्ण प्रकाश आले होते अडचणीत

पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे सेवा विकास बँक प्रकरणात अडचणीत आले होते.  सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने मुख्यमंत्र्यांनाच त्यांच्यासंदर्भात पत्र लिहिले होते. त्यात सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात संचालकांना अटक करण्याचे आदेश असताना त्यांनी अटक केली नाही. त्यासाठी त्यांनी साडेतीन कोटी रुपये घेतले होते, असा आरोप करण्यात आला होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.