AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

आज पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2025 | 7:52 PM
Share

आज पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला. या घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील 38 जणांना वाचवण्यात यश आलं आहे, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात ही घटना  घडली आहे. आज रविवार असल्यानं या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा अंदाजे 50 च्या आसपास पर्यटक या पूलावर होते. तसेच काही जणांनी या पूलावर आपली बाईक देखील घातली. वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचं बोललं जात आहे. दरम्यान या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे, याबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांनी माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी? 

‘ही घटना दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस विभाग आणि महसूल विभाग घटनास्थळी हजर झाले. तातडीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं. काही लोक इथे पर्यटनासाठी आले होते. याचदरम्यान हा पूल कोसळला. पूलावर असलेले पर्यटक नदीत पडले.

आतापर्यंत 38 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे, यातील जे अनेक लोक आहेत त्यांना किरळकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. तर या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे.  जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याठिकाणी आधीच आपण बंदीचे आदेश लागू केले होते. दहा दिवसांपूर्वीच त्या संदर्भात आपण आदेश जारी केला होता. पर्यटकांनी अशा धोक्यांच्या जागी जाऊ नये असं सांगण्यात आलं होतं. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला शासनातर्फे पाच लाखांची मदत केली जाणार आहे, या संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आदेश दिला आहे.  तसेच जे लोक जखमी झाले आहेत, त्यांच्यावर पूर्णपणे मोफत उपचार केले जातील, अशी माहिती जिल्हााधिकाऱ्यांनी दिली आहे.  दरम्यान आज रविवारी असल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी झाली, याचवेळी ही घटना घडली आहे.

...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.