AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

First bullock cart race | अखेर भीर्रर्रर्र चा नाद घुमनार ! नववर्षाच्या सुरुवातीला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावात भरणार बैलगाडा शर्यत

बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळवण्यासाठी लांडेवाडीतील सरपंच व बैलगाडा मालक ग्रामस्थांची एकी कामी आली. सर्वांनी नेटाने जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता केली. त्यामुळेच अतिशय क्लिष्ट समजली जाणारी बैलगाडा शर्यतीची परवानगी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या गावाला सर्वात आधी मिळाली.

First bullock cart race | अखेर भीर्रर्रर्र चा नाद घुमनार ! नववर्षाच्या सुरुवातीला आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी गावात भरणार बैलगाडा शर्यत
shivajirao adhalrao patil
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 26, 2021 | 5:17 PM
Share

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. नवीन वर्षाच्या स्वागतालाच जिल्ह्यात पहिली बैलगाडा शर्यती भरणार आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी 1 जानेवारी 2022 पहिल्या बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे.

इथे होणार आहे शर्यत राज्यात पहिली बैलगाडा शर्यत पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे नव्या वर्षाच्या सुरुवातीला भरणार आहे, 1 जानेवारी 2022 रोजी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या लांडेवाडी गावात ही शर्यत होणार असून सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करत जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने हि शर्यत आयोजित केली जाणार असल्याने नव्या वर्षात लांडेवाडीत भिर्रर्रर्रर्र चा नाद घुमणार असल्याने बैलगाडा मालकांमध्ये एक उत्साह आहे.जिल्हाधिकारी पशुसंवर्धन अधिकारी पोलिस खाते यांच्या अधिकृत परवानग्या घेऊन हि शर्यत होणार असून सर्व बैलगाडा मालकांनी नियम पालन करत शर्यतीचा आनंद लुटण्याचे आवाहन या वेळी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांना केले आहे..

कोरोनाच्या नियमांचे होणार पालन बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी मिळवण्यासाठी लांडेवाडीतील सरपंच व बैलगाडा मालक ग्रामस्थांची एकी कामी आली. सर्वांनी नेटाने जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता केली. त्यामुळेच अतिशय क्लिष्ट समजली जाणारी बैलगाडा शर्यतीची परवानगी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या गावाला सर्वात आधी मिळाली. बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाली असली तरी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. बैलगाडा शर्यत खंड ना पडू देता सुरु राहाव्यात यासाठी बैलगाडा मालकांनी शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.

Ind vs SA: दक्षिण आफ्रिकेच्या जखमेवर मीठ चोळत मयांकची अर्धशतकांची ‘हॅट्रिक’

Jammu-Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस चौकीवर हल्ला; दोन पोलीस जखमी

अतिवृष्टी-अवकाळीचा सामना करुनही मराठवाड्यात बदलतोय पीकांचा ट्रेंड , काय आहेत कारणे?

Follow Us
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष