धक्कादायक ! ‘वेळ आलीय बारामतीच्या ‘गांधी’ साठी.. बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची’ असे लिहणाऱ्यावर गुन्हा दाखल

| Updated on: May 16, 2022 | 11:40 AM

सोशल मीडियातील ट्विटर या साईटवर निखिल भांबरे या तरुणांने ' वेळ आलीय बारामतीच्या 'गांधी' साठी.. बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची'असे ट्विट केले. याबरोबरच बाराचा काका माफी माग असा हॅशटॅगही या तरुणाने वापरला आहे. तरुणाने केलेल्या या ट्विटला जवळपास ९४जणांनी रिट्विट केले आहे.

धक्कादायक ! वेळ आलीय बारामतीच्या गांधी साठी.. बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची असे लिहणाऱ्यावर गुन्हा दाखल
Sharad Pawar
Image Credit source: social Media
Follow us on

पिंपरी- अभिनेत्री केतकी चितळेने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने राज्यभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली असून 18 मी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल आहे. हे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर (Social Media) निखिल भांबरे या तरुणाने शरद पवार यांना उद्देशून ‘ वेळ आलीय बारामतीच्या ‘गांधी’ साठी.. बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची’ अशा आशयाचे बदनामीकारक,मानहानीकारक व जीवे मारण्याची धमकीचा मजकूर लिहल्याचे समोर आले आहे. तरुणाच्या सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टची देहू पोलिसांनी (Dehu  police )तात्काळ दखल घेतली असून या प्रकरणी तरुणांवर कलम 504,505(2),506,153(A),500,501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण

सोशल मीडियातील ट्विटर या साईटवर निखिल भांबरे या तरुणांने ‘ वेळ आलीय बारामतीच्या ‘गांधी’ साठी.. बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची’असे
ट्विट केले. याबरोबरच बाराचा काका माफी माग असा हॅशटॅगही या तरुणाने वापरला आहे. तरुणाने केलेल्या या ट्विटला जवळपास 94 जणांनी रिट्विट केले आहे. तर दहा जणांनी यावर कमेंट केल्या आहेत. 700 हून अधिक लोकांनी या ट्विटला लाईक केले आहे.

सर्व स्तरातून निषेध

शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह मजकुराचा राज्यभरातून निषेध करण्यात आला. याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले. विरोधी पक्षातील नेत्यांनीही केतकी चितळेंच्या या लिखाणाचा निषेध केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे सुजाता आंबेडकर यांनीही केतकी चितळेंच्या लिखाणाचा निषेध केला आहे. चितळेंचे वक्तव्य अतिशय घाणेरडे व चुकीचे होते. तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं असेल तर तुम्ही कुणाच्या तरी धोरणांवरती  टीका करा. पण कोणाच्याही दिसण्यावर किंवा अंगावर नाही. खास करून शरद पवारांसारख्या नेत्यांना ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र मानतो. त्यांच्यावर लिहणे हे शोभणारे नव्हते.

हे सुद्धा वाचा