पुणे जिल्ह्यातील संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण

| Updated on: Jan 08, 2021 | 9:10 AM

शहीद संभाजी राळे हे आसामच्या तेजपुर इथं नाईक पदावर कार्यरत होते. 102 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती होती.

पुणे जिल्ह्यातील संभाजी राळे यांना अरुणाचल प्रदेशात वीरमरण
Follow us on

पुणे: संपूर्ण देश नव वर्षाचं स्वागत आणि सणवारांच्या उत्साहात दंग आहे. अशावेळी देशाचं रक्षण करणारे भारतीय लष्कराचे जवान सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी सदैव सज्ज असतात. त्यातच पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कुरकुंडी गावचे जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी संभाजी राळे शहीद झाले. अरुणाचल प्रदेश इथं तब्येत खालावल्यामुळे त्यांना वीरमरण प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Sambhaji Rale martyred in Arunachal Pradesh)

शहीद संभाजी राळे हे आसामच्या तेजपुर इथं नाईक पदावर कार्यरत होते. 102 इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये त्यांची नियुक्ती होती. संभाजी राळे यांच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. संभाजी राळे यांना वीरमरण आल्यानं राळे कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

देशात नववर्षाचं स्वागत सुरु असताना सीमेवर शत्रूंच्या कुरघोडी सुरुच आहेत. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी भारतीय सैन्याने जोरदार प्रतिकार करत जशास तसे उत्तर देत शत्रूला पळता भूई थोडी केली.

चिनी ड्रॅगन युद्धाच्या तयारीत?

पूर्व लडाखमधील एलएसीवर भारताच्या चौकीसमोर चीनने आपल्या तोफ तैनात केल्याची बातमी समोर आली आहे. चीनच्या या चालीनंतर भारतीय सैन्यानेही सीमेवर आपल्या तोफ तैनात केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या टी -90 आणि चीनच्या टी -15 टँक 200 मीटरच्या अंतरावर समोरासमोर उभ्या आहेत. एलएसीच्या रेजांगला, रेचिन ला आणि मुखोसरी इथं चीनने आपली लाईट टँक टी -15 तैनात केली आहे. तर दुसरीकडे, चीनची 12 युद्धनौका अंदमान बेटाकडे पाठवण्यासाठीही सज्ज केल्या आहेत. चीनच्या या भयंकर कृत्याबद्दल अमेरिकेने भारतीय नौदलाला इशाराही दिला आहे.

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज

चीनच्या कोणत्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. सीमेवर चीनच्या हालचाली लक्षात घेता भारतीय सैन्यही मोठ्या शस्त्रसाठ्यासह तैनात आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय सैन्याने 16,000 फूट उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांसाठी कपडे, तंबू, खाद्यपदार्थ, इंधन, हीटर आणि संप्रेषण उपकरणेदेखील उपलब्ध करुन दिली आहेत. यासह चीनच्या कोणत्याही कृतीला तोंड देण्यासाठी सैन्याच्या तीन अतिरिक्त विभागांना पूर्व लडाखमध्ये तैनात केले आहे.

संबंधित बातम्या:

भारतीय जवानांच्या कामाला सलाम, हिमवृष्टीतही गर्भवती महिलेला खांद्यावर नेलं रुग्णालयात

छत्तीसगड, महाराष्ट्रातून 100 नक्षलवाद्यांची मध्य प्रदेशात घुसखोरी; अर्धसैनिक दल घेणार झाडाझडती

Sambhaji Rale martyred in Arunachal Pradesh