पुणेकर काय करतील त्याचा नेम नाही, बालकनीमध्ये अडकलेल्या तरूणाने केलं असं काही…, होतेय प्रचंड चर्चा

सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुण बालकनीमध्ये अडकले असून त्यांनी बाहेर पडण्यासाठी जी मार्ग निवडला त्यांची होतेय प्रचंड चर्चा.

पुणेकर काय करतील त्याचा नेम नाही, बालकनीमध्ये अडकलेल्या तरूणाने केलं असं काही..., होतेय प्रचंड चर्चा
| Edited By: | Updated on: Jan 10, 2026 | 8:08 PM

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्याची चर्चा अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड होताना दिसते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. ते म्हणतात ना पुणेकर काय करतील त्याचा नेम नाही.

दरम्यान, सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ साधारण रात्री 3 वाजताचा आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आणि त्याचा मित्र चुकून आपल्या घराच्या बाल्कनीत अडकले आहेत. बाल्कनीचा दरवाजा बंद झाला आणि घरातील इतर सदस्य झोपेत असल्याने मदत मिळण्याची कोणतीही अपेक्षा त्यांच्याकडे नव्हती. पण ते पुणेकर आहेत. अशा वेळी या तरुणांनी दाखवलेली युक्ती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमकं काय घडलं? 

घाबरून न जाता या तरुणांनी एक भन्नाट उपाय शोधला. त्यांनी थेट ऑनलाइन शॉपिंग आणि डिलीव्हरी प्लॅटफॉर्म ‘ब्लिंकिट’ वर ऑर्डर दिली आणि डिलीव्हरी एजंटला फोनवरून संपूर्ण परिस्थिती समजावून सांगितली. अतिरिक्त चावी कुठे ठेवलेली आहे. मुख्य दरवाजा कसा उघडायचा आणि झोपलेल्या पालकांना त्रास न होता घरात कसा प्रवेश करायचा याबाबत त्यांनी शांतपणे सांगितले.

डिलीव्हरी एजंटनेही ही सर्व घटना समजून घेत अतिशय शांतपणे आणि जबाबदारीने ही परिस्थिती हाताळली. त्याने दिलेल्या सूचनांचे अचूक पालन करत घराचा दरवाजा उघडला आणि बाल्कनीत अडकलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. या एजंटच्या व्यावसायिक वृत्तीचे आणि समजूतदारपणाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

ही संपूर्ण घटना पुण्यातील रहिवासी मिहिर गहुकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर ब्लिंकइटनेही प्रतिक्रिया देत ‘हे फक्त पुण्यातच होऊ शकते’ अशी मजेशीर कमेंट केली आहे.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संपूर्ण घटनेत अडकलेल्या मित्रांची हुशारी आणि विशेषतः ब्लिंकइट डिलीव्हरी एजंटचे असाधारण प्रयत्न दिसून येतात. एका युजरने कौतुक करत म्हटले, तो शांत राहिला, सूचनांचे पालन केले आणि परिस्थिती योग्यरीत्या हाताळली अशा व्यक्तीला नक्कीच मोठी टिप मिळायला हवी. ही घटना मजेशीर नाही तर योग्य वेळी दाखवलेल्या शहाणपणामुळे अडचणीच्या प्रसंगातून मार्ग कसा काढता येतो याचे उत्तम उदाहरण आहे.