AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : दीड तास दरडीखाली अडकून होता, महाडच्या रेस्क्यू टीमनं वाचवलं; वरंध घाटातल्या वाघजाई मंदिर परिसरातला थरार

जवळपास दीड तासांनी दरडीखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र यात हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसाळ्यात अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी वरंध घाटात गर्दी करत असतात.

Pune : दीड तास दरडीखाली अडकून होता, महाडच्या रेस्क्यू टीमनं वाचवलं; वरंध घाटातल्या वाघजाई मंदिर परिसरातला थरार
वरंध घाटात दरड कोसळतानाची दृश्यImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jun 30, 2022 | 3:42 PM
Share

पुणे : महाड मार्गावरील वरंध घाटात, वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात दरडीखाली अडकून एक जण जखमी गंभीर (Seriously injured) जखमी झाला आहे. अरूण गणपत उंब्रटकर असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाडच्या रेस्क्यू टीमच्या मदतीने तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर जखमी तरुणाला वाचविण्यात यश आले. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दरड कोसळतानाची दृश्य मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. अरूण उंब्रटकर यांचे घाटातील वाघजाई मंदिराशेजारी भजी, वडापावचे दुकान होते. दुपारच्या सुमारास अचानक डोंगराचा काही भाग अरूण यांच्या दुकानावर कोसळला (Collapsed). यामुळे अरूण हे त्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली अडकून बसले. ही बातमी समजताच महाडची रेस्क्यू टीम (Rescue team) घटनास्थळी दाखल झाली.

सुदैवाने आत पर्यटक नव्हते

जवळपास दीड तासांनी दरडीखाली अडकलेल्या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले. मात्र यात हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पावसाळ्यात अनेक पर्यटक वर्षाविहारासाठी वरंध घाटात गर्दी करत असतात. वाघजाई मंदिर परिसरातून वरंध घाटाचे विलोभनीय दृश्य दिसत असल्याने या भागात पर्यटक थांबतात. त्यामुळे या परिसरात स्थानिक नागरिकांनी उपाजीविकेसाठी भजी, वडापावची दुकाने लावली आहेत. वाघजाई मंदिराला लागूनच असलेल्या अरूण यांच्या दुकानावर ही दरडी कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दुकानात अरूण यांच्याशिवाय कोणताही पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

30 ठिकाणी कोसळल्या होत्या दरडी

घटनेची माहिती मिळताच भोरचे प्रांतधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार सचिन पाटील, भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, उद्धव गायकवाड यांच्यासह भोर आणि महाड तालुक्यातील्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मागच्यावर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये, वरंध घाटात जवळपास 30 ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. यंदाही दरडी कोसळण्याचा धोका अधिक असल्याने स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?