बारामतीतील अभिषेक ननवरे वयाच्या 18व्या वर्षी ठरला ‘आयर्नमॅन’

| Updated on: Nov 22, 2021 | 5:28 PM

या स्पर्धेसाठी अभिषेकने आपल्या वडिलांकडून धडे घेतले. अभिषेकचे वडील सतीश ननवरे  यांनी जागतिक पातळीवर तीनदा आयर्नमॅन चा किताब मिळवला आहे. त्यांकडून प्रेरणा घेत अभिषेकाने हा किताब जिंकला आहे. स्पर्धेत वेळेची अचूक कामगिरी त्याने दाखवली आहे.

बारामतीतील अभिषेक ननवरे वयाच्या 18व्या वर्षी ठरला आयर्नमॅन
Abhishek Nanavar 'Ironman'
Follow us on

पुणे – बारामतीतील अभिषेक सतीश ननवरे याने वयाच्या 18 व्या वर्षी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करत नवीन विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे नुकतीच ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत निर्धारित वेळेपूर्वीच अत्यंत कमी वेळात स्पर्धा पूर्ण करत आयर्नमॅन’ हा  मानाचा किताब मिळविला आहे. अभिषेकने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून अभिनंदन केलं जात आहे.

सुप्रिया सुळेनी  ट्विट करत केलं अभिनंदन 

अभिषेकच्या यशाबद्दल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत अभिनंदन केलं आहे. ‘ दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे पार पडलेल्या जागतिक पातळीवरील आयर्नमॅन स्पर्धेत बारामती येथील अभिषेक सतीश ननवरे याने यश संपादन केले. ही अतिशय खडतर स्पर्धा त्याने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी पुर्ण केली. या उज्ज्वल यशाबद्दल अभिषेक, त्याचे प्रशिक्षक व‌ पालकांचे हार्दिक अभिनंदन’ असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

वडिलांकडून घेतले धडे
या स्पर्धेसाठी अभिषेकने आपल्या वडिलांकडून धडे घेतले. अभिषेकचे वडील सतीश ननवरे  यांनी जागतिक पातळीवर तीनदा आयर्नमॅन चा किताब मिळवला आहे. त्यांकडून प्रेरणा घेत अभिषेकाने हा किताब जिंकला आहे. स्पर्धेत वेळेची अचूक कामगिरी त्याने दाखवली आहे. अभिषेक भारतातला सर्वात कमी वयाचा आयर्नमॅन आहे. अभिषेक हा बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षांपासून तो आयर्नमॅनसाठी तयारी करत होता.

कशी असते स्पर्धा

  •  या स्पर्धेत 180 किमी सायकल चालवणे,
  • 42.2 किमी धावणे,
  • 3.8 किमी समुद्रात पोहणे,

वरील तिन्ही गोष्टी कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेतला पूर्ण करणे अपेक्षित असते. जगभरातील अनेक व्यवसायिक स्पर्धक यामध्ये सहभागी होतात.

आता ‘मागेल त्याला ठिबक सिंचन’, 80 टक्के अनुदानाचा असा घ्या योजनेचा लाभ

Nashik| अवकाळी पावसाने द्राक्ष बागांवर संकटाची बरसात; शेतकऱ्यांची झोप उडाली!

‘मुलगी कमावते, तू आरामात बसून खातोस?’ बापाने लेकीचं कुंकू पुसलं, पाय कापून जावयाची हत्या