Pimpri-Chinchwad | पिंपरीत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई

फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 239 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर दंडात्मक करण्यात आली आहे. या कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे.

Pimpri-Chinchwad | पिंपरीत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 12:07 PM

पिंपरी – वाहतुकीच्या नियमांचे(Traffic Rule )  पालन न करता अतिशय वेगानं वाहने चालविल्याने अनेकदा अपघात (accidents)  घडताना दिसतात. बेधुंद पद्धतीने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांवर परिवहन कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सातत्याने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 239 कार चालकांवर पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन (Pimpri-Chinchwad Sub Regional Transport) कार्यालयाने कारवाई करत दंड आकाराला आहे. पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकांनी, इंटरसेप्टर वाहनांत बसविण्यात आलेल्या स्पीडगनच्या पुणे-नाशिक व पुणे मुंबई महामार्गांवर ठरवून दिलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

18 लाखाहून अधिक दंड वसूल फेब्रुवारी महिन्यात 1 हजार 239 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर दंडात्मक करण्यात आली आहे. या कारवाईतून सुमारे 18 लाख 9000 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. वाहन धारकांनी वेग मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. अनेक वेळा वेग जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहन चालकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी अतुल आदे यांनी केली आहे.

बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई याबरोबरच बेकायदेशीररित्या दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या जवळपास 20 दुचाकीस्वरांवरही परिवहन विभागाने कारवाई केली आहे. कारवाई अंर्तगत एकूण 1 लाख 46 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर संबंधितांच्या दुचाकी स्वरांचे नोंदणी प्रमाणपत्राचे निलंबन देखील केले आहे. यानंतर अश्या प्रकारच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महामार्गांवर वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याने होणाऱ्या अपघातांचे तसेच अपघाती मृत्यूंचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे रस्ता सुरक्षा तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोणातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकामार्फत वेळोवेळी कारवाई केली जाते.

नातेवाईकांच्या साखरपुड्याला जाताना बाईक अपघात, पित्यासह लहान मुलाचाही मृत्यू

महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक, कारण तुम्हाला माहिती आहे का ?

क्रुझ ड्रग्जप्रकरणात कोणते मंत्री, आमदार होते याचा तपास करा, मी पुरावे देतो, मोहित कंबोज यांचा पोलीस आयुक्तांना आवाहन

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.