Passport Office : राज्यातील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर डाऊन, काम खोळंबल्याची प्रशासनाची माहिती, नागरिक संतप्त

| Updated on: Jul 25, 2022 | 4:20 PM

सर्व्हर डाऊन असल्याची कल्पना नागरिकांना दिली गेली नव्हती. त्यामुळं ते चांगलेच संतापले. अमरावती, परभणीतही पासपोर्ट केंद्राचे सर्व्हर डाऊन होते.

Passport Office : राज्यातील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर डाऊन, काम खोळंबल्याची प्रशासनाची माहिती, नागरिक संतप्त
काम खोळंबल्याची प्रशासनाची माहिती
Follow us on

मुंबई : राज्यातील पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाले. सर्व्हर डाऊन असल्यामुळे पुणे पासपोर्ट ऑफिसमधील काम खोळंबलीत. इतर राज्यातही सर्व्हर डाऊन असल्याची पासपोर्ट ऑफिस (Passport Office) प्रशासनाची माहिती दिली. अमरावतीत चार तासांनंतर पासपोर्ट ऑफिसचे सर्व्हर सुरू झाले. राज्यात पासपोर्ट कार्यालयाचे सर्व्हर डाऊन (server down) झाल्यामुळे पासपोर्ट ऑफिसमधील कामे खोळंबली होती. अमरावती येथीलही पासपोर्ट ऑफिसचे सर्व्हस सकाळी 10 वाजतापासून बंद होते. त्यामुळे पुणे, अमरावती, परभणीत कार्यालयात गोंधळ उडाला होता. सर्व्हर डाऊन असल्यामुळे कामे ठप्प झाल्याने नागरिक ताटकळत बसले होते. अखेर दुपारी दोन वाजून 15 मिनिटाने सर्व्हर पुन्हा सुरू झाले. त्यामुळे चार तासांनी कामाला वेग आला आहे. पासपोर्ट कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाल्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पासपोर्ट कार्यालयातून नागरिकांना अपाइंटमेंट (appointment) दिली जाते. अपाइमेंट घेऊनही सर्व्हर डाऊन असल्यामुळं नागरिकांना पासपोर्ट कार्यालयात ताटकळत बसावं लागलं. त्यामुळं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

मेसेस किंवा ईमेल का केला नाही

पुणे, अमरावती आणि परभणी येथील पासपोर्ट कार्यालायातील सर्व्हर डाऊन झाले होते. त्यामुळं चार-पाच तास पासपोर्ट कार्यालयात गेलेल्या नागरिकांना वाट पाहावी लागली. सर्व्हर डाऊन असल्याचं कारण नागरिकांना सांगण्यात आलं. यामुळं नागरिकांचा चांगलाच संताप झाला. सर्व्हर डाऊन होता मग बोलावलंच कशासाठी असा सवाल संतप्त नागरिकांनी केलाय. तसेच मेसेज किंवा ई मेल करून का कळविलं नाही, असा जाब संतप्त नागरिकांनी विचारला. यावर प्रशासन समाधानकारण उत्तर देऊ शकले नाही.

पुण्यातील घोरपडी केंद्रावर गर्दी

पासपोर्टचा संबंध फक्त श्रीमंतांशीच येतो असं नाही. सामान्य लोकंही आता पासपोर्ट काढू लागलेत. देशात सुमारे 250 पासपोर्ट केंद्र आहेत. पुण्यातल्या घोरपडी येथील पासपोर्ट केंद्रावर राज्यभरातील नागरिक पासपोर्ट काढण्यासाठी येतात. पुण्यातील पासपोर्ट केंद्रावर नेहमी गर्दी असते. त्यासाठी अपाइंटमेंट घ्यावी लागते. सर्व्हर डाऊन असल्याची कल्पना नागरिकांना दिली गेली नव्हती. त्यामुळं ते चांगलेच संतापले. अमरावती, परभणीतही पासपोर्ट केंद्राचे सर्व्हर डाऊन होते.

हे सुद्धा वाचा