AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार दिल्लीवरुन पुण्यात दाखल, पवार कुटुंबियांचा कार्यक्रमास जाणार का? शरद पवार म्हणाले…

Ajit Pawar and Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर अजित पवार तातडीने दिल्लीत रवाना झाले. अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार पुण्यात आले.

अजित पवार दिल्लीवरुन पुण्यात दाखल, पवार कुटुंबियांचा कार्यक्रमास जाणार का? शरद पवार म्हणाले...
Ajit PawarImage Credit source: tv9 Marathi
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Nov 11, 2023 | 10:55 AM
Share

योगेश बोरसे, पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार तातडीने दिल्लीत रवाना झाले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया विचारली असता माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार यांना विचारले असता, त्यांनी ‘दिवाळीच्या शुभेच्छा’, अशी दोन शब्दांत प्रतिक्रिया दिली. परंतु अजित पवार अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी का गेले? हा प्रश्न राज्यात चांगलाच चर्चेला गेला. नवी दिल्लीत अमित शाह आणि अजित पवार यांच्यात ४० मिनिटे खलबते झाले. त्यानंतर रात्री १२ वाजता अजित पवार पुण्यात दाखल झाले.

अमित शाह यांच्या भेटीनंतर अजित पवार पुण्यात

शरद पवार, सुप्रिया सुळे यांची भेट झाल्यानंतर अजित पवार काल दुपारी 2 वाजता पुणे विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले होते. अजित पवार यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी साधारण ४० मिनिटे अमित शाह यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळाली. या भेटीनंतर रात्री पावणे बारा वाजता पुण्यात दाखल झाले. अमित शाह यांना भेटून आल्यानंतर अजित पवार आता बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या पाडाव्याच्या कार्यक्रमास जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शरद पवार यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढउतार येत असतात. आयुष्यात अडचणी येत असतात. सर्व प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. या सर्व संकटाचा विसर करून आनंदाने दिवस जगावे, अशी इच्छा असणार दिवस म्हणजे दीपावली होय. मी महाराष्ट्रातील जनतेला हा दिवाळीचा सण आनंदाने जावा त्यांच्या व्यक्तिगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी लाभावी, अशी शुभेच्छा देतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी