AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

leopards in Chakan | तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद ; कंपनी कामगारांनी सोडला सुटकेचा निश्वास

बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाचा जीव भांडयात पडला आहे. वन विभागाने सुरक्षितपणे बिबट्याला ताब्यात घेतले आहे.

leopards in Chakan | तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर बिबट्या जेरबंद ; कंपनी कामगारांनी सोडला सुटकेचा निश्वास
leopard in chakanImage Credit source: TV9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Mar 21, 2022 | 12:53 PM
Share

पुणे – तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर चाकण एमआयडीसीतील बिबट्याला(leopards) जेरबंद करण्यात वन विभागाला (Forest Department ) यश आले आहे.सकाळी 11:30  च्या सुमारास बिबट्याला यशस्वीरित्या बंद करण्यात आले. बिबट्या पिंजऱ्यात कैद होताच कंपनीतील कामगार व वनविभागासह, पोलीस प्रशासनाचा जीव भांडयात पडला आहे.नर जातीचा हा बिबट्या असून अडीच वर्ष वयाचा हा बिबट आहे या बिबट्या ला आता पुन्हा दुर नैसर्गिक आदिवासात सोडलं जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन विभागाने सुरक्षितपणे बिबट्याला ताब्यात घेतले आहे. चाकण एमआय डीसीतील मर्सिडीज बेंज कंपनीत पहाटेच्या सुमारास (Mercedes Benz) बिबट्या घुसल्याचे -पहाटेच्या सुमारास कंपनीच्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर हीबाब समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

कंपनीतील कामगारांना बाहेर काढले

घटनेची माहिती मिळताच कंपनीतील कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले होते . पहाटेच्या सुमारास कंपनी च्या सुरक्षारक्षकाला बिबट्या दिसल्यानंतर ही बाब समोर आली.मात्र हा बिबट्या कंपनी आवारात कुठून आणि कसा आला हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यानंतर तातडीने वन विभाग पोलीस यांना घटनेचीमाहिती देण्यात आली. त्यानंतर बिबट्या मर्सिडीज बेंज कंपनीमधील बॉडी शॉप मध्ये असल्याची खात्री करण्यात आली. पुढे पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

नागरिकांवर हल्याची प्रकरणे

यापूर्वी जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर, जुन्नर याभागात बिबट्या शेतात तर कधी कोंबड्याच्या खुराडयात , विहिरीत बिबट्या आढळून आला आहे. एवढं नव्हे तर पाळीव प्राण्यांना फस्त करण्याबरोबरच , लहानमुलांसह नागरिकांवरही हल्ले केले आहेत. याबरोबरच पुण्यातील कात्रज बोगद्या येथेही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. जिल्ह्यातील भौगोलिक वातावरण तसेच उसाच्या शेतीमुळे मागील काही वर्षात बिबट्याचा अधिवास वाढला आहे.

Sugar Factory : महाराष्ट्रातील 13 साखर कारखान्यांची धुराडी बंद तरीही साखर उत्पादनात राज्य अव्वल स्थानी..!

Lakshya Sen : घरातूनच बॅडमिंटनचा वारसा, एकाच सामन्यात प्रकाश पदुकोण बनले जबरा फॅन, कसा होता लक्ष्यचा प्रेरणादायी प्रवास?

Trupti Desai : ‘एकविसाव्या शतकात संकुचित विचार करत बसलो, तर कुटुंब नियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील’

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट