खाजगी कॅब ड्रायव्हरच्या वागणूकीमुळे त्रस्त आहात, मुंबई ग्राहक पंचायत घेत आहे ऑनलाईन सर्वेक्षण

| Updated on: May 06, 2023 | 7:01 PM

महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली असून सर्वं संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत. म्हणून याबाबतीत सर्वेक्षण घेण्यात येत आहे. या सेवेबद्दल ग्राहकांची मते काय आहेत हे जाणून घेण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीने ऑनलाईन सर्वेक्षण सुरू केले आहे.

खाजगी कॅब ड्रायव्हरच्या वागणूकीमुळे त्रस्त आहात, मुंबई ग्राहक पंचायत घेत आहे ऑनलाईन सर्वेक्षण
app based taxi
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : मुंबई ग्राहक पंचायतीने ओला ( Ola ) , उबर ( Uber ) आणि मेरू ( Meru ) या खाजगी टॅक्सीच्या सेवेसंदर्भात ऑनलाईन सर्वेक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ओला, उबर आणि मेरू यांच्यावर अंकूश ठेवण्यासाठी अलिकडेच राज्य सरकारने धोरण ठरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने त्यासाठी कमिटी स्थापन केली असून त्यामुळे ग्राहकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या आहेत. त्यामुळे मुंबई ग्राहक पंचायतीने ( MGP ) गुगल फॉर्मवर ग्राहकांकडून या सेवे संदर्भात येत्या 8 मेपर्यंत प्रवाशांकडून मते मागविली आहेत.

काळी-पिवळी टॅक्सी सेवा जवळची भाडे नाकारात असल्याने तसेच या टॅक्सी आरामदायक नसल्याने मोबाईल अ‍ॅप आधारित खाजगी टॅक्सी सेवा अस्तित्वात आली आहे. ओला, उबर आणि मेरू सारख्या खाजगी टॅक्सी ग्राहकांना आरामदायी सेवा पुरवित आहेत. परंतू या मोबाईल अ‍ॅपआधारीत टॅक्सी सेवेत प्रवाशांचे डेस्टीनेशन आधी ड्रायव्हरला कळण्याची सोय नव्हती. परंतू या टॅक्सी सेवेचे भाडे डायनामिक असल्याने मागणी आणि पुरवठ्याच्या गणितावर ते आधारित आहे. परंतू तरीही या सेवेवर कोणाचाही अंकूश नसल्याने ड्रायव्हरबद्दल अनेक प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

ड्रायव्हरच्या वागणूकीबद्दल तक्रारी

खाजगी टॅक्सी चालक काळ्या-पिवळ्या टॅक्सी ड्रायव्हरप्रमाणे ग्राहक जर ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिला असतील तर त्यांचे लगेज किंवा सामान डीकीत ठेवण्यास मदत करीत नाहीत, तसेच अनेक खाजगी टॅक्सी तक्रार वही किंवा आरटीओचे हेल्पलाईन क्रमांक तसेच पॅनिक बटण अशी सुविधा नसते. अनेक खाजगी टॅक्सी चालक भाडे बुक झाल्यानंतर स्वत: हून रद्द करीत असतात, काही चालक स्वत: भाडे रद्द करतात आणि कॅन्सलेशन चार्जेस ग्राहकांच्या माथी मारतात. अनेक चालक गैरवर्तणूक करीत असतात. किंवा लांबच्या मार्गाने गाडी नेतात अशा सर्व पर्याय गुगल फॉर्मवर देण्यात आले असून या संदर्भात प्रवाशांनी हे पर्याय निवडून सोमवार दि. 8 मे दुपारी 1 वाजण्याच्या आत हा गुगल फॉर्म भरून सबमिट करायचा आहे.

MGP On-line Survey Ola, Uber & other Cab Aggregators’ Services

Greetings from Mumbai Grahak Panchayat (MGP), a registered Voluntary Consumer Organization from Mumbai.

Govt of Maharashtra is currently in the process of framing regulations to regulate the operations/services of Cab aggregators such as Ola, Uber, Meru etc and has invited suggestions from stakeholders before 9th May 2023.

We are therefore undertaking a quick On-line survey on services offered by these cab aggregators with a view to make suggestions to the Govt. for adequately protecting consumer interest.

Kindly therefore participate in this Survey by clicking the link given here :

https://forms.gle/RLoetgbHc93vVRGL7

The ,Last date for responding to this Survey is Monday, 8th May 2023 till 1 pm.

We also request you to share this link with your friends & relatives too for doing needful.

Thank you.

Shirish Deshpande
Chairman – MGP

सरकारला प्रवाशांचा फिडबॅक मिळणार

महाराष्ट्र शासनाने याविषयावर एक समिती नेमली असून 9 मे पर्यंत सर्वं संबंधितांकडून सूचना मागवल्या आहेत. म्हणून याबाबतीत सर्वेक्षण घेऊन प्रत्यक्ष ग्राहकांची मते काय आहेत हे जाणून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. या सर्वेक्षणातून येणाऱ्या feedback च्या आधारे मुंबई ग्राहक पंचायत शासनाला याबाबतीत सूचना करेल. त्यामुळे सरकारी कमिटी समोर प्रवाशांचा फिडबॅक मिळेल असे मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी टीव्ही नाइन मराठीशी बोलताना स्पष्ट केले.